Friday, July 5, 2024

जेव्हा भर रस्त्यात नाचायला लागली होती सारा अली खान, भिकारी समजून लोकांनी टाकले होते पैसे

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan)इंडस्ट्रीमधील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाने तिने तिचे नाव कमावले आहे. ती एक स्टारकिड आहे, तरी देखील मेहनतीच्या जोरावर तिचे नाव कमावले. तिला साधे आयुष्य जगायला आवडते. तिच्या सरळ आणि साध्या स्वभावाने तिने पॅपराजींचे देखील मन जिंकले आहे. तिच्याबाबत आपण अनेक किस्से ऐकले असतीलच, परंतु आज एक रंजक किस्सा जाणून घेऊयात.

सारा अली खानने एका मुलाखतीदरम्यान स्वतःबद्दल असा एक किस्सा सांगितला होता, जो ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. खरंतर, एका जुन्या मुलाखतीत साराने एक किस्सा सांगितला होता. ती म्हणाली की, “मी एकदा माझ्या आई-वडिलांसोबत फिरायला गेले होते. यादरम्यान मी एका दुकानात गेला होता आणि मी माझ्या घरच्यांसोबत बाहेर बसलो होतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

साराने पुढे सांगितले की, “त्यावेळी मी अचानक डान्स करायला सुरुवात केली. पण मला कळत नाही की, लोक मला पैसे का देऊ लागले.” पुढे अभिनेत्री हसली आणि म्हणाली की, “त्या लोकांना वाटत होते की, मी नाचत नाही तर भीक मागत आहे. साराने पुढे सांगितले की, तिला वाटले की मला अशा प्रकारे नाचण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी पैसे मिळवत होते ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मी आणखी सार्वजनिक ठिकाणी नाचू लागले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

 

एवढेच नाही तर सारा अली खानने पुढे सांगितले की, तिने ते सर्व पैसे तिच्याकडे ठेवले आहेत. साराने सांगितले की, तिच्या घरच्या मदतनीसांनी माझ्या पालकांना या सर्व गोष्टी सांगितल्या की, लोकांना तिची वागणूक गोंडस वाटत होती, परंतु तिने असेही सांगितले की तिच्या आईने साराला त्यावेळी सांगितले होते की ती भिकाऱ्यासारखी दिसते आहे, गोंडस नाही. मग पैसे देतीलचं ना.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

मैत्रीदिनी मित्राला भन्नाट डायलॉग मारायचाय?, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी, वाचा ३१ डायलॉग एकाच क्लिकवर

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्डा’वर अन्नू कपूर यांची प्रतिक्रिया समोर; म्हणाले, ‘तो कोण आहे?’

काळीज तोडणारी बातमी! सिनेविश्व गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, चाहते शोकसागरात

हे देखील वाचा