वंदना गुप्ते या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. अनेक चांगले चांगले सिनेमे आणि नाटके त्यांनी केली आहेत. चांगल्या अभिनयासाठी त्या नेहमीच ओळखल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की ठाकरे कुटुंबियांचे आणि वंदना ताईंचे चांगले संबंध आहेत म्हणून त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी या गोष्टीवर प्रकाश टाकला आहे.
वंदना यांचा नुकताच बाईपण भारी देवा हा सिनेमा प्रदर्शित होऊन गेला. हा सिनेमा विशेष लोकप्रिय झाला. नुकत्याच एका यू ट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, त्याकाळी घरी यायला दीड किंवा दोन वाजायचे. पण तेव्हा काही वाटायचं नाही. भीती वाटायची नाही किंवा काळजी सुद्धा नसायची.
तेव्हा बाळासाहेब ठाकरे मला भूत म्हणायचे. मला आठवतंय त्यांनी एकदा मला विचारलं होतं. तू एवढ्या उशीरा येतेस तर मी तुला बंदुकीचं लायसन्स काढून देऊ का ? तर तेव्हा त्यांना माझे पती शिरीष म्हणाले की नको, पहिला खून माझाच होईल.
वंदना गुप्ते गेली अनेक वर्षे अभिनयात सक्रीय आहेत. त्यांनी काही मालिका आणि चित्रपटांत कामे केली आहेत. मराठी सोबतच त्यांनी हिंदीतही कामे केली आहेत. पछाडलेला या सिनेमातील त्यांची दुर्गाबाई हि भूमिका अतिशय गाजली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सीए बनण्याची तयारी करणाऱ्या सिद्धांतने पहिल्या कमाईतून भावाला दिले होते हे गिफ्ट; पुढे झाला अभिनेता…