Saturday, March 2, 2024

जेव्हा रागाच्या भरात हेमा मालिनींना मारायला गेला होता सनी देओल! आई प्रकाश कौर यांनी सांगितली हकीकत

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ राज्य केले आहे. 86 वर्षीय धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. धर्मेंद्र हे 60, 70 आणि 80च्या दशकात खूप लोकप्रिय होते. त्यांच्या चित्रपटांची आजही खूप चर्चा होते. धर्मेंद्र यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातूनही अनेक चर्चा रंगवल्या आहेत. मीना कुमारी (Meena Kumari) आणि अनिता राज (Anita Raj) यांसारख्या अभिनेत्रींसोबत त्यांचे अफेअर होते. त्याचबरोबर धर्मेंद्रने दोन लग्न केले आहेत. धर्मेंद्र यांनी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पहिले लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे.

हिंदू धर्माचे असलेले धर्मेंद्र यांनी पहिले लग्न शीख धर्मातील प्रकाश कौर यांच्याशी केले होते. धर्मेंद्र यांचा पहिल्या लग्नात फिल्मी जगाशी कोणताही संबंध नव्हता. धरमजी आणि प्रकाश कौर हे चार मुलांचे पालक झाले. अजिता देओल आणि विजेता देओल या दोन मुली. ज्यामध्ये सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल हे दोन भाऊ आहेत.

लग्नाच्या 6वर्षांनंतर धर्मेंद्र यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. फिल्मी दुनियेच्या रंगात रंगल्यानंतर धरमजींनी त्यांचे दुसरे लग्न ज्येष्ठ आणि सदाबहार अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत केले. हेमा मालिनी (Hema Malini) आणि धरम जी यांनी जवळपास 25चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. विवाहित असून, देखील धर्मेंद्र हेमा यांच्यावर फिदा होते. एकत्र काम करताना धरमजी आणि हेमा मालिनी यांचे प्रेम वाढू लागले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की, दोघांनी देखील आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला.

हेमा आपल्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबतच एक अतिशय सुंदर अभिनेत्री देखील होती. अनेक कलाकार त्यांच्या प्रेमात पडले होते. त्याचवेळी धरमजींचे हृदय हेमाजींसाठी धडधडू लागले. धरमजी हेमावर प्रेम करत असताना हेमानेही धर्मेंद्रवर पहिल्याच नजरेने आपले मन गमावले होते आणि तिने विवाहित धर्मेंद्रशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी आपल्या प्रेमाला नवीन नाव दिले आणि 1980मध्ये लग्न केले.

लग्नानंतर हेमा आणि धर्मेंद्र ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुलींचे पालक झाले. धर्मेंद्र आणि हेमा यांचे लग्न सोपे नव्हते. धर्मेंद्रच्या दुसऱ्या लग्नामुळे त्यांची पत्नी आणि त्यांची मुले खूप निराश झाली होती. दरम्यान, धर्मेंद्र यांचे मुलं आणि प्रकाश कौर यांच्याशी संबंध बिघडले होते. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी म्हणजेच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओल यांच्या वयात फक्त आठ वर्षांचा फरक आहे. सनी त्याच्या सावत्र आईपेक्षा फक्त आठ वर्षांनी लहान आहे. धर्मेंद्र आणि हेमा यांचे लग्न झाले, तेव्हा सनी खूप मोठा होता आणि त्याच्या कुटुंबाचे आणि त्याच्या आईचे काय होत आहे, हे त्याला चांगलेच ठाऊक होते.

माध्यमांतील वृत्तानुसार, एकदा सनी हेमा यांच्यासोबत भांडायला गेला होता. यावर बोलताना सनीची आई प्रकाश कौर यांनी एकदा सांगितले होते की, या गोष्टी चुकीच्या आहेत. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी माझ्या मुलांना असे संस्कार दिलेले नाहीत की त्यांनी असे पाऊल उचलावे.” तर एकदा हेमा त्यांच्या मुलाखतीत त्यांच्यासोबत झालेल्या एका अपघाताचा संदर्भ देत म्हणाल्या होत्या की, “माझ्या चेहऱ्यावर झालेल्या दुखापतीचे स्टिचिंग कोण करणार आहे याचीही विशेष काळजी सनीने घेतली होती. मला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा धरमजी आणि सनी मला मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात, तुम्ही माझ्या आणि सनीमधील बॉन्डिंग समजून घेऊ शकता.” धर्मेंद्र यांच्या अलीकडील वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर ते लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे.


हेही वाचा –
बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी झाली मोठी चोरी, पोलिसात तक्रार दाखल
‘या’ टॉप 5 बॉलीवूड क्लासिक गाण्यांसह साजरा करा यंदाच्या नवरात्रीत गरबा, पाहा यादी

हे देखील वाचा