Monday, July 1, 2024

प्रेम चोप्रांकडून झाली होती गलती से मिस्टेक! नायिकेने ‘चुकीला माफी नाही’ म्हणत कानाखाली काढला होता जाळ

मंडळी, बॉलिवूडमध्ये खरं नाव जर कुठला कलाकार कमावत असतो तर तो असतो चित्रपटातील खलनायक! एक क्षण विचार करा जर हे खलनायक नसते तर आज ज्या कलाकारांना आपण नायक म्हणून ओळखतो आहोत त्यांना आज ही ओळख मिळालीच नसती. जितकी नाव नायक साकारणाऱ्या कलाकारांची आपल्या ओठांवर येतील त्यापेक्षा एखादं दुसरं नाव जास्तीच खलनायकाचं आपल्याला आठवेल. कारण, एकेकाळी या खलनायकांनी प्रेक्षकांमध्येही त्यांची दहशत पसरवली होती. अमजद खान, कादर खान, प्रेम चोप्रा, प्राण, परेश रावल, अनुपम खेर, आशिष विद्यार्थी, नामदेव गोविंद, डॅनी डेंझोप्पा असे अनेक कलाकार आहेत जे खलनायक म्हणून आपल्यासमोर आले. या कलाकारांच्या आयुष्यात अनेक वेगवेगळे किस्से देखील होत असतात. आज प्रेम चोप्रा यांचा किस्सा जाणून घेऊयात ज्यात एका नायिकेने त्यांना सूड घेण्यासाठी जोरदार थोबाडीत मारली होती.

ऐंशीच्या दशकात बहुतेक चित्रपटांमध्ये बलात्कारांचीच दृश्ये दाखवली जायची. प्रेम चोप्रा यांच्या एका चित्रपटातील असाच एक सीन पूर्ण करण्यास बराच वेळ लागत होता. या सीनमध्ये त्यांना पाठीमागून नायिकेला इतकं घट्ट पकडायचं होतं की नायिकेला जराही हलता येऊ नये. कित्येक रीटेकनंतर हा सीन पूर्ण झाला. प्रेम चोप्रा यांनी शेवटच्या टेकमध्ये नायिकेला इतकं घट्ट पकडलं होतं की तिला हातही हलवता येत नव्हते. यामुळे नायिका खूप चिडली आणि तिने दिग्दर्शकाकडे प्रेम चोप्रा यांची तक्रार केली. नायिका दिग्दर्शकाकडे गेली आणि म्हणाली की प्रेम चोप्रा यांनी तिला इतकं घट्ट पकडलं होतं की, तीच्या हातांना दुखापत झाली होती.

मग काय पुढच्या सीनमध्ये नायिकेचा कानशिलात मारण्याचा सीन होता. शूटिंग दरम्यान नायिकेने प्रेम चोप्रा यांना इतक्या जोरात कानशिलात लगावली की सेटवरील सगळेजण एकाएकी स्तब्ध झाले. स्वत: प्रेम चोप्रा यांनी या संदर्भात एका मुलाखतीत वरील प्रसंग घडल्याचं मान्य केलं होतं.

याबद्दल प्रेम चोप्रा जेव्हा दिग्दर्शकाकडे तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा नायिकेला त्यांचा सूड घ्यायचा आहे, असं समजलं, म्हणून तिने त्यांना जोरदार कानशिलात लगावली. तसेच, प्रेम चोप्रा हे ऐकून आश्चर्यचकित झाले की आधीच त्यांची तक्रार दिग्दर्शकांपर्यंत पोहोचली होती.

हे देखील वाचा