×

वयाच्या १५ व्या वर्षी उर्फी जावेदचा फोटो झाला होता एडल्ट साइटवर अपलोड, केला धक्कादायक खुलासा

हिंदी मनोरंजन जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच त्या नेहमी चर्चेत असतात. यामध्ये अतरंगी उर्फी जावेदच्या (Urfi Javed) नावाचा पहिल्यांदा समावेश होतो. उर्फी तिच्या एकापेक्षा एक चित्र विचित्र कपड्यांमुळे कायम माध्यमांमध्ये चर्चेत असते. तिच्या अतरंगी कपड्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अनेकदा तिला या फॅशनमुळे नेटकऱ्यांनी ट्रोलही केले आहे. मात्र तरीही ती चर्चेत राहण्यासाठी नेहमीच काहीना काही उद्योग करत असते. आता अलिकडेच उर्फीने तिच्या आयुष्यातील एका धक्कादायक खुलासा केला आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, उर्फी जावेद ही बिग बॉस ओटीटीपासून चांगलीच चर्चेत आली आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने ती सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवत असते. तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या उर्फी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. आपल्या आयुष्यातील एक मोठा खुलासा तिने एका कार्यक्रमात बोलताना हा खुलासा केला आहे. यावेळी उर्फीने तिचा एक फोटो अडल्ट साईटवर शेअर झाल्याचे सांगितले होते.

या घटनेबद्दल सांगताना ती म्हणाली की, “हा संपूर्ण प्रकार मी लखनौमध्ये असताना घडला होता. त्यावेळी मी १५ वर्षाची होते. त्यावेळी मी ऑफ शोल्डर टॉप घालून त्याचे फोटो माझ्या फेसबूकवर पोस्ट केले होते. त्यावेळी अशा प्रकारचे कपडे क्वचितच मिळायचे त्यामुळे त्या टॉपची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र हा फोटो अज्ञात व्यक्तीने एका अडल्ट साईटवर अपलोड केला होता. ज्यामुळे मला माझ्या कुटूंबियांनी आणि नातेवाईकांनी खूप खडेबोल सुणावले.”

याबद्दल पुढे बोलताना उर्फीने सांगितले की, “माझ्या घरच्यांनी यावर राग व्यक्त करताना माझ्या या फोटोबद्दल खूप संताप व्यक्त केला. एकतर असे कपडे घालणेही चुकीचेही आहे. आणि त्यात तु फोटो काढून सोशल मीडियावरही अपलोड केलास म्हणत घरच्यांनी खूप नाराजी व्यक्त केली होती.” त्याचबरोबर अशा कठीण परिस्थितीतच व्यक्तीला स्वतःमधील सामर्थ्याची नव्याने ओळख होते असेही उर्फी म्हणाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post