Monday, April 15, 2024

सामाजिक कार्य ते महाभयंकर आजार जाणून घ्या समंथा प्रभूबद्दल माहित नसलेल्या ‘या’ गोष्टी

दाक्षिणात्य सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये समंथा रुथ प्रभूचे (Samantha Ruth Prabhu)  नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने समंथाने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. समंथा तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असते. शुक्रवारी (28, एप्रिल) समंथाचा वाढदिवस. आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या वाढदिवसामुळे चाहत्यांसह अनेकांनी तिच्यावर  शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. जाणून घेऊया समंथाच्या आयुष्यातील माहित नसलेल्या गोष्टींबद्दल. 

अभिनेत्री समंथा ही दाक्षिणात्य तसेच हिंदी सिने जगतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अभिनयाने समंथाने यशाचे हे शिखर गाठले आहे. आज समंथाही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये समंथाने काम केले आहे. फॅमिली मॅन सिरीजमधील समंथाच्या धडाकेबाज भूमिकेने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. मनोज वाजपेयींसोबतच्या तिच्या या भूमिकेने समंथाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मात्र यशाचे हे शिखर गाठण्यासाठी समंथाला बराच संघर्ष करावा लागला होता. समंथाच्या वाढदिवसानिमित्त पाहूया तिच्या बद्दलच्या माहित नसलेल्या या 8 गोष्टी.

१. सुरूवातीचे आयुष्य – अभिनयात येण्यापूर्वी सामंथा कॉमर्स पदवी दरम्यान मॉडेलिंग असाइनमेंटवर अर्धवेळ नोकरी करत असे.

२.  दुसरे नाव– समंथाला तिचे मित्र आणि कुटुंबीय प्रेमाने यशोदा म्हणून संबोधतात.

३.  खाद्यप्रेमी समंथा- समंथा सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची चव चाखणारी खाद्यप्रेमी आहे. तिची आवडती डिश सुशी आहे जी व्हिनेगर राइजसह तयार केलेली जपानी डिश आहे.

४.प्रवासाची आवड –समंथाला नवीन ठिकाणांना भेट देणे आणि एक्सप्लोर करणे आवडते. ती दररोज तिच्या सोशल अकाउंटवर सुंदर डेस्टिनेशनचे फोटो शेअर करत असते.

५. प्रेरणा स्थान- सामंथा हॉलिवूड अभिनेत्री ऑड्रे हेपबर्नला आपला आदर्श मानते.

६. सामाजिक संस्था – समंथाने  प्रत्युषा सपोर्ट नावाची एनजीओ स्थापन केली आहे जी गरीब मुले आणि आजारी महिलांना मदत करते.

७. मधुमेहाची शिकार –समंथाला 2013 मध्ये मधुमेहाच्या आजाराची माहिती मिळाली. पुढे तिने सत्यमूर्ती चित्रपटात मधुमेही रुग्णाची भूमिकाही केली होती.

८. फिटनेस लव्हर –  समंथा टॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली ही अभिनेत्री तिचे वर्कआउट व्हिडिओ शेअर करत असते, ज्यामुळे चाहत्यांना तिच्या फिटनेस रूटीनबद्दल माहिती मिळते. तिच्या ट्रेनरनेही  तिची तुलना विराट कोहलीशी केली आहे, नुकत्याच एका मुलाखतीत ट्रेनर जुनैद म्हणाला होता की समंथा जर अभिनयात आली नसती तर ती कोहलीसारखीच असती. (samantha ruth prabhu birthday samantha unknown fact)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : पैसे कमावण्यासाठी समंथा रूथ प्रभेने केले होते मॉडेलिंगमध्ये पदार्पण, ‘इतके’ होते पहिले मानधन
‘तेरे नाम’ हिट झाल्यानंतर ‘या’ दाेन चित्रपटातून भूमिका चावलाला का केले रिप्लेस? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा