Saturday, November 23, 2024
Home कॅलेंडर ‘या’ विचित्र कारणामुळे धरम पाजी खाऊन यायचे कांदा, वैतागलेल्या आशाजींनी थेट दिग्दर्शकाकडे केली होती तक्रार

‘या’ विचित्र कारणामुळे धरम पाजी खाऊन यायचे कांदा, वैतागलेल्या आशाजींनी थेट दिग्दर्शकाकडे केली होती तक्रार

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कलाकारांना बराच वेळ एकत्र घालवावा लागतो. ईच्छा असो किंवा नसो, कामानिमित्त त्यांना एकत्र यावेच लागते. मग या वेळेत काहीजणांची चांगली मैत्री होते, तर काहीजणांच्या भांडणांचे किस्से कानावर येतात. अभिनयक्षेत्रात असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांची मैत्री आजही टिकून आहे. परंतु त्यांच्यामध्ये देखील सुरुवातीला अनेक मतभेद झालेले आहेत. शिवाय शूटिंगदरम्यान अनेकांना सह-कलाकाराच्या वेगवेगळ्या आणि विचित्र सवयी सहन कराव्या लागतात. काहीजण ते सहनही करतात. मात्र याला अपवाद काहीजण या गोष्टींना विरोध करतात. अभिनेते धर्मेंद्र आणि प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांच्यामध्ये देखील असेच काहीसे घडले होते. जाणून घेऊया तो रंजक किस्सा…

‘आये दिन बहार के’
हा किस्सा आहे रघुनाथ झलानी ‘आये दिन बहार के’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा. हा प्रसंग एका रियॅलिटी शो दरम्यान खुद्द आशाजींनी सांगितला होता. अद्भुत मैत्रीमागील ही एक गमतीशीर कथा जाणून घेऊयात.

धर्मेंद्र आणि आशा पारेख हे दोघेही साठ- सत्तरच्या दशकातील मोठे स्टार होते. सध्या धर्मेंद्र आणि आशा पारेख हे दोघेही चित्रपटांपासून खूप दूर आहेत, पण आपल्या काळात या दोघांनी प्रेक्षकांवर जादू केली होती. त्यांचे चित्रपट हाऊसफुल व्हायचे. आशा पारेख या आघाडीच्या नायिका होत्या. त्यांचे चित्रपट रौप्यमहोत्सव साजरा करायचे. त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘ज्युबिली पारेख’ असेही म्हणतात. त्यामुळे कोणतेही दिग्दर्शक आणि अभिनेते त्यांच्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्नही करत नसे. धरम पाजी यांना असलेली दारूची आवड कुणापासून लपलेली नाही. आजकाल त्यांना जितकं फार्महाऊसमध्ये भाजीपाला लावण्याची आवड आहे, तितकीच त्याकाळी दारूबद्दल आवड होती. असे म्हणतात की, धर्मेंद्र यांनी अगदी लहान वयापासूनच दारू पिण्यास सुरुवात केली. हा किस्सा दार्जिलिंग या सुंदर हिल स्टेशनमध्ये चालू असलेल्या ‘आये दिन बहार के’ चित्रपटाचे शूटिंगदरम्यानचा आहे.

‘आये दिन बहार के’ चित्रपटाच्या सेटवर सीनचे पॅकअप होताच दारूच्या बाटल्या उघडल्या जात असे. धर्मेंद्र यांच्यासह चित्रपटाचे दिग्दर्शक आणि टीमचे इतर सदस्यदेखील रात्री दारू पीत बसत. धर्मेंद्र इतके मद्यपान करायचे की, सकाळीसुद्धा त्यांच्या तोंडून दारूचा वास जात नसे. आशाजी या एक मोठ्या स्टार होत्या आणि त्यांच्यासोबत धरम पाजी शूटिंग करत होते. त्यामुळे धर्मेंद्र यांना आशाजींचा ओरडा खाण्याची सतत भीती वाटत असे.

दारूचा वास लपवण्यासाठी खायचे कांदा
अशा परिस्थितीत धर्मेंद्र यांनी आशाजींचा ओरडा टाळण्यासाठी एक विचित्र युक्ती शोधून काढली. ते दारूचा वास लपवण्यासाठी कांदे खाऊन सेटवर येत असत आणि इकडे धर्मेंद्र यांच्या तोंडातून येणाऱ्या कांद्याच्या वासाने आशाजी मात्र अस्वस्थ होत असत. शेवटी खूप वैतागून आशा यांनी दिग्दर्शकांकडे तक्रार केली की, धर्मेंद्रच्या तोंडातून कांद्याचा वास येतो आणि त्या अशा शूट करू शकत नाहीत. त्यानंतर अखेर धर्मेंद्र यांनी आशाजींना सांगितले की आपण केवळ दारूचा वास लपविण्यासाठी कांदे खात होतो. यावर आशा पारेख यांनी धर्मेंद्र यानां दारू पिऊ नये असे जोरदार प्रतिउत्तर दिले. त्यानंतर धर्मेंद्र यांनी देखील आशा पारेख यांना आश्वासन दिले की, ते सेटवर कधीही दारू पिणार नाहीत.

थंडीत निळे पडूनही धर्मेंद्र यांनी मोडले नाही वचन
पुढे आशा पारेख यांनी सांगितले की, वचनानुसार त्यानंतर धर्मेंद्र यांनी एक थेंब देखील मद्यपान केले नाही. त्यावेळी चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना पाण्यात उभे राहून गाण्याचे शूट करावे लागले होते. शूटिंग चालू असताना धर्मेंद्र थंडीमुळे निळे पडायचे. त्यामुळे त्यांना ब्रँडी ऑफर करण्यात आली आली. मात्र, धर्मेंद्र यांनी कोणत्याही किंमतीत आपले दारू न पिण्याचे वचन मोडले नाही. त्यांना भीती होती की आशा पारेख कदाचित शूटिंग सोडून निघून जाऊ शकतात. येथूनच ते दोघेही चांगले मित्र झाले आणि ही मैत्री आजही तशीच सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडमध्ये तयार झाले गांधीजींच्या विचारांचं दर्शन घडविणारे चित्रपट, एकावर तर पाकिस्तानने घातली होती बंदी

-‘मला खुश राहायचंय’, म्हणत घराच्या छतावर पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली ‘स्वीटू’

-लग्नाच्या पहिल्या रात्रीच अक्षय कुमारला समजलं होतं पत्नी ट्विंकलचं ‘हे’ सत्य, अभिनेत्याने सर्वांसमोर केला खुलासा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा