Friday, April 25, 2025
Home कॅलेंडर तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

दिग्गज अभिनेत्री रेखा यांनी बॉलिवूडमध्ये खूप कमी वयातच काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी ‘अंजाना सफर’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेली अभिनेत्री रेखा आज जरी 66 वर्षांच्या असल्या, तरीही त्यांच्या सौंदर्यापुढे आजही अनेक अभिनेत्रीं फिक्या पडतात. त्यांनी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनात कधीही न मिटणारी छाप सोडली आहे. रेखांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. बॉलिवूडमध्ये रेखांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. असेच एकदा त्यांच्या आयुष्यात वळण आले होते, जेव्हा शूटिंगदरम्यान रेखा बेशुद्ध झाल्या होत्या.

दिग्गज अभिनेत्री रेखा यांनी बॉलिवूडमध्ये खूप कमी वयातच काम करण्यास सुरुवात केली. वयाच्या पंधराव्या वर्षी ‘अंजाना सफर’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा रेखाचा पहिला चित्रपट असला, तरीही तो त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय चित्रपट राहिला आहे. कारण, चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान असे काहीतरी घडले की, ज्यामुळे रेखा मनातून तुटून गेल्या होत्या. याचा खुलासा रेखा यांनी स्वतःचे आत्मचरित्र ‘रेखा: दि अनटोल्ड स्टोरी’मध्ये केला आहे.

यासेर उस्मान यांनी लिहिलेल्या पुस्तकात रेखा यांनी सांगितले की, 1969 मध्ये आलेल्या ‘अंजना सफर’ या चित्रपटाचे शूटिंग मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये सुरू होते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता विश्वजीत होता. ज्याच्यासोबत रेखा यांना किसींग सीन द्यायचा होता. सीनच्या शूटिंग आधी सर्व नियोजन करण्यात आले होते आणि जेव्हा दिग्दर्शकाने ऍक्शन म्हणायला सुरुवात केली, तेव्हा विश्वजीतने रेखाला पकडले आणि किस करायला सुरुवात केली. विश्वजीतच्या या वागण्यामुळे रेखा चिंताग्रस्त झाल्या. त्यांना याबद्दल पूर्वकल्पना नव्हती. दिग्दर्शकाने कट कट म्हणल्यावर सुद्धा विश्वजीत थांबण्याचे नाव घेत नव्हता. सलग पाच मिनिटे हा किसींग सीन चालला त्यानंतर रेखा बेशुद्ध झाल्या.

या किसींग सीननंतर रेखा खूप रडल्या होत्या. त्यावेळी विश्वजीतने सांगितले की, “हे सगळं दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार झाले आहे. यात माझी काहीच चूक नाही.” हे ऐकून रेखाला खूप आश्चर्य वाटले. या घटनेमुळे रेखा खूप घाबरल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

-निळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं मृण्मयी देशपाडेचं रूप, फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

-मयुरी देशमुखच्या नव्या लूकने वेधले चाहत्यांचे मन; काळ्या डॉटेड पोल्कोमधील फोटो झाला व्हायरल

हे देखील वाचा