कपिल शर्माचा कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो ‘ टीव्हीवरील सर्वात जास्त लोकप्रिय आहे. या शोला दर्शक खूप पसंत करतात. टीआरपी बाबतीत सुद्धा हा शो इतर शोला मागे सोडतो. कपिलच्या या शोमध्ये बॉलिवूडच्या सगळ्याच सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली सुद्धा या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. शोमध्ये विराटने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल खूप गोष्टी उघड केल्या. तेव्हा विराटने हे सुद्धा सांगितले की, एकदा कपिलचा शो पाहण्यासाठी त्याला तीन लाख रुपयाची भरपाई करावी लागली होती.
महागात पडलं कपिलचा शो पाहणं
विराटने सांगितले की, जेव्हा इंडियन क्रिकेट टीम फ्री असते तेव्हा सगळ्यांना एकत्र बसून कपिलचा शो पाहायला आवडतं. या सोबतच विराटने सांगितले, जेव्हा तो त्याच्या फ्लाईटची वाट पाहत असतो तेव्हा तो हाच शो पाहतो. विराटने म्हणाला, ‘आत्ताच श्रीलंकेत माझ्यासोबत असे घडले. आम्ही विमानतळावर वाट पाहत होतो. मी खूप बोर होत होतो. तेव्हा विचार केला की काहीतरी पहावं. करण्यासारखं काही नव्हतं. खूप उशीरही झाला होता आणि सामानाच्या बाबतीत थोडी अडचणही झाली होती. पण मला हे लक्षातच आल नाही, की माझ्याकडे वाय-फाय नाहीये.’ (when virat kohli had dto pay 3 lakh rupees to watch kapil sharmas show)
विराटला आलं तीन लाख रुपये बिल
विराटने पुढे सांगितले, ‘मला समजलं नाही की माझ्याकडे वाय-फाय नाहीये म्हणून. मी माझ्या इंडिया 3G सेल्यूलर नेटवर्कवर शो पाहण्यास सुरुवात केली. एक तास मी इंटरनॅशनल रोमिंगवर कपिलचा शो पहात होतो. त्यानंतर मला माझ्या भावाचा कॉल आला. तेव्हा त्याने मला विचारले तु काय करत आहेस? तेव्हा मी म्हणालो, काही नाही सामानाची वाट पाहत आहे. त्यानंतर त्याने मला सांगितले की माझ्या फोनचे बिल तीन लाख रुपये आले आहे.
पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे शो
कपिल शर्माच्या शोबद्दल बोलायचं झालं, तर हा शो पुन्हा टीव्हीवर सुरू होणार आहे. कपिल शर्माने नुकतीच अशी घोषणा केली आहे, की तो त्याच्या टीमसोबत सगळ्यांना हसवण्यासाठी परत येत आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या निर्मात्यांनी याचा प्रोमो सुद्धा रिलीझ केला आहे. ज्यामध्ये संपूर्ण टीम एका नव्या उत्साहात पाहायला मिळत आहे. तसेच या शोमध्ये नवीन बदल झाल्याचे दिसणार आहेत. या शोमध्ये सुदेश लहरीची एन्ट्री झाली आहे, तर सुमोना चक्रवर्ती शोमध्ये दिसणार नाही. शिवाय अभिनेता अक्षय कुमार शोच्या या सीझनचा पहिला गेस्ट असू शकतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’