Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड कोण आहे उर्मिला मातोंडकरचा नवरा मोहसिन अख्तर मीर? मॉडेलिंग आणि अभिनयानंतर ठेवले व्यवसायात पाऊल

कोण आहे उर्मिला मातोंडकरचा नवरा मोहसिन अख्तर मीर? मॉडेलिंग आणि अभिनयानंतर ठेवले व्यवसायात पाऊल

आठ वर्षांच्या लग्नानंतर उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) पती मोहसिन अख्तर मीरपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी अनेक चाहत्यांना धक्का बसली आहे. मुंबई न्यायालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता आणि वृत्तानुसार हे विभक्त होणे परस्पर संमतीने झाले नव्हते. मात्र, वेगळे होण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मोहसिनची पार्श्वभूमी, सुरुवातीची कारकीर्द आणि उर्मिलासोबतचे नाते कसे होते हे जाणून घेऊया

उर्मिलाने 2016 मध्ये गुपचूप लग्न केले आणि जेव्हा तिने तिच्या लग्नाची घोषणा केली तेव्हा अभिनेत्रीचे चाहते आश्चर्यचकित झाले कारण दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते आणि त्यांच्या वयात खूप फरक होता. मोहसीन एक मॉडेल आणि बिझनेसमन आहे. मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी वयाच्या 21 व्या वर्षी ते मुंबईत आले.

यानंतर 2007 साली मोहसीनला मिस्टर इंडिया स्पर्धेत दुसरा उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले. मोहसीनला पहिला ब्रेक प्रीती झिंटासोबत एका जाहिरातीत मिळाला. 2009 मध्ये, त्याने ‘इट्स अ मॅन्स वर्ल्ड’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली, त्यानंतर त्याने फरहान अख्तरच्या ‘लक बाय चान्स’मध्ये छोटी भूमिका केली.

बॉलीवूडमध्ये यशस्वी करिअर करू न शकल्यामुळे मोहसीन पडद्यावर फारसा दिसला नाही आणि त्यानंतर त्याने पडद्यापासून दुरावले आणि काश्मीरमध्ये आपला व्यवसाय सुरू केला. 2014 मध्ये डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात उर्मिला आणि मोहसीनची भेट झाली आणि दोघांमधील जवळीक वाढू लागली.

त्यानंतर 4 फेब्रुवारी 2016 रोजी जवळचे कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत एका खाजगी समारंभात त्यांनी लग्न केले. दोघांच्या वयात जवळपास 10 वर्षांचा फरक आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

लग्नाच्या आठ वर्षांनंतर उर्मिला मातोंडकर पती मोहसीन अख्तर मीरपासून होणार विभक्त घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये तमन्ना भाटियाच्या किलर पोझ; सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

हे देखील वाचा