विकी कौशल की कॅटरिना कैफ, दोघांमध्ये कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?


अभिनेता विकी कौशल (Vicky kaushal) आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif ) ९ डिसेंबरला विवाह बंधनामध्ये अडकले. त्यांच्या लग्नानंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, अभिनेत्री आणि चाहत्यांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. नेहमी आपल्या नात्यावर मौन बाळगणाऱ्या जोडीने त्यांचे लग्न धूमधडाक्यामध्ये केले. त्यांच्या लग्नाविषयी आणि त्यांच्यामधील वयातील अंतराविषयी देखील खूप चर्चा झाल्या. कॅटरिना कैफ पती विकी कौशलपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे. दोघांचा चाहतावर्ग देखील खूप जास्त आहे. लग्नाच्या चर्चेमध्ये विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या संपत्तीला घेऊनही चर्चा होत आहे. या जोडीकडे एकूण संपत्ती किती आहे व दोघांपैकी कोण सर्वात जास्त श्रीमंत आहे, अशा चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगू लागल्या आहेत.

विकी कौशलची एकूण संपत्ती
विकी कौशल आणि कॅटरिना कैफ या दोघांनीही अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे लाखो दिवाने आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘उरी’ या चित्रपटातील अभिनेता विकी कौशलचे नेटवर्थ ३ मिलियन डॉलर्स, म्हणजेच २२ कोटी रुपये आहे. त्याला महागड्या गाड्या खूप आवडतात. त्याच्याकडे रेंज रोवर, जीएएलसी एसयूवी या गाड्या आहेत. विकी कौशल हा प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम कौशल यांचा मुलगा आहे. विकी कौशलने त्याच्या अभिनयाची सुरुवात ‘मसान’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटानंतर एकापाठोपाठ त्याला अनेक चित्रपटात लीड रोल मिळाले. (who is more rich or katrina kaif vicky kaushal)

कॅटरिना कैफची एकूण संपत्ती
कॅटरिना कैफविषयी बोलायचे झाले, तर ती बॉलिवूडमध्ये सर्वात अधिक मानधनी घेणारी अभिनेत्री आहे. २००३ रोजी तिने तिच्या करिअरला सुरुवात केली. तिने त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅटरिना कैफची एकूण संपत्ती २२४ करोडहून अधिक आहे. अभिनेत्री एका चित्रपटासाठी ९ ते १० करोड रुपये मानधन घेते आणि वर्षभरात ती २२-२३ करोड कमवते. कॅटरीना कैफकडे बऱ्याच लक्झरी गाड्या देखील आहेत. रेंज रोवर, मर्सिडिज, ऑडी क्यू या गाड्यांचे कलेक्शन तिच्याकडे आहे.

हेही वाचा


Latest Post

error: Content is protected !!