Tuesday, April 15, 2025
Home साऊथ सिनेमा आलियानंतर ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने वयाच्या ४१ व्या वर्षी दिली गुड न्यूज

आलियानंतर ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने वयाच्या ४१ व्या वर्षी दिली गुड न्यूज

सध्या सिने जगतात अनेक अभिनेत्री त्यांच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत येताना दिसत आहेत. हिंदी सिने जगतातील तसेच मराठी सिने जगतातील अनेक अभिनेत्रींनी सध्या गुड न्यूज दिल्याच्या बातम्या चांंगल्याच व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्री आलिया भट्टने तर लग्नानंतर दोन महिन्यातच गुड न्यूज दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता  तेलुगू सिनेजगतातील अभिनेत्री नमिता वंकावालाने वयाच्या ४१ व्या वर्षी ही गुड न्यूज दिल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

अस म्हणतात की आई होण्याचा आनंद काय असतो हे एक आईच सांगू शकते. मातृत्व हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मिळालेला सर्वात आनंदाचा क्षण असतो. असाच आनंद तेलुगू सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री नमिता वंकावालाला झाला आहे. तेलुगू सिने जगतातील ही लोकप्रिय अभिनेत्री सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.विशेष म्हणजे अभिनेत्री नमिता वंकावालाने वयाच्या ४१ व्या वर्षी ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली आहे. प्रेग्नेंसी काळाचा आनंद घेत असलेली अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर बेबी बंप प्लॉंन्ट करतानाचे फोटो शेअर करत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

 

इतकेच नव्हेतर अभिनेत्री सध्या एक आदर्श आई होण्यासाठीही प्रयत्न करताना दिसून येत आहे. यासाठीच तिने या फोटोंसोबत “एक आदर्श आई होण्यासाठी एक नम्र विद्यार्थी व्हावे लागते,” असा कॅप्शन तिने दिला आहे. यावरुन अभिनेत्री आई होण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे. दरम्यान अभिनेत्री नमिता वंकावालाने 2017 विवाह केला होता.  नमिताचा विवाह वीरेंद्र चौधरीसोबत झाला होता. लग्नाच्या पाच वर्षानंतर ती आई बनण्यास तयार आहे. 10 मे 2022 रोजी तिचा वाढदिवस साजरा करताना, नमिताने तिच्या गरोदरपणाची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. दुसरीकडे, अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वेळी ती मिया चित्रपटात दिसली होती. त्याच वेळी, तिचा आगामी चित्रपट ‘बो बो’ आहे, ज्यामध्ये ती ब्लॉगरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा