Monday, June 17, 2024

आरोपींना धारेवर धरणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आहेत ‘या’ मराठी अभिनेत्रीचे पती; घ्या जाणून

जून २०२० मध्ये अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. सुशांत सिंगच्या मृत्यूची चौकशी करत असताना या तपासात अनेक वेगवेगळे धागेदोरे मिळत गेले आणि त्याच्या मृत्यूचा तपस येउन पोहचला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी पर्यंत. त्यानंतर या प्रकरणाची अंमली पदार्थांच्या बाजूने देखील चौकशी सुरु झाली आणि यात दीपिका पदुकोणपासून भारती सिंग, सारा अली खान आदी अभिनेत्रींपर्यत सर्वांची चौकशी करण्यात आली. साधारण दिड वर्षांपूर्वी सुरु झालेली नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाची कारवाई आजतागायत चालू आहे. आजपर्यंत अनेक लहान मोठ्या सेलिब्रिटींची या विभागाने चौकशी केली. नुकताच शाहरुख खानच्या मुलाला आर्यन खानला अंमली पदार्थांच्या केसमध्ये अटक करण्यात आली आहे. या सर्व चौकशी मागे एक चेहरा सतत मीडियामध्ये येत आहे आणि तो चेहरा आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा. हे सर्व तपाससत्र, धाडसत्र, कलाकारांच्या चौकशी, कलाकारांच्या अटक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालीच चालू आहे. जेव्हा जेव्हा नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे नाव समोर येते तेव्हा समीर वानखेडे हे नाव देखील ओघाने येतेच नक्की कोण आहे, समीर वानखेडे? आज या लेखातून जाणून घेऊया समीर वानखेडेबद्दल अधिक माहिती.

मूळचे महाराष्ट्रातील असणारे समीर वानखेडे २००४ च्या बॅचचे IRS (भारतीय राजस्व सेवा) अधिकारी आहेत. त्यांचे वडील पोलीस अधिकारी होते. भारतीय महसूल सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपसीमा शुल्क आयुक्त म्हणून होती. त्यांच्या क्षमता आणि कामावरील प्रेम पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीला पाठवण्यात आले. ते अंमली पदार्थांसंबंधित बाबींमध्ये तज्ञ मानले जातात.

समीर यांनी त्यांच्या हुशारीमुळे मागच्या दोन वर्षांमध्ये जवळपास १७ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पकडण्यात आले. समीर वानखेडे यांची २०२०मध्ये डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे बदली झाली. समीर वानखेडे हे त्यांच्या कर्तव्याप्रती आणि कामाप्रती अतिशय प्रामाणिक आहेत. जेव्हा जेव्हा त्यांच्या कर्तव्याचा प्रश्न येतो तेव्हा समोर कोण आहे याची त्यांना पर्वा नसते. ते फक्त त्यांचे कर्तव्य प्रामाणिक पद्धतीने पार पडत असतात. समीर यांच्या प्रामाणिकपणाबद्दलचे अनेक किस्से प्रसिद्ध आहे. आपल्यासमोर कलाकार आहे, सेलिब्रिटी, क्रिकेटर कोणीही असले तरी समीर कामाबद्दल आणि कर्तव्य वाजवण्यात कोणतीच हयगय करत नाही.

कोणताही प्रवासी ३५ हजार रुपयांपर्यंत परदेशातून माल भारतात आणू शकतो, परंतु त्यापेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंच्या बाबतीत ३६% कस्टम टॅक्स भरावा लागतो. मालाची किंमत ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास कस्टम अधिकारी त्याला अटक देखील करू शकतो. समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंसीसह पकडले होते. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमने बॉलिवूडमधील प्रसिद्ध लोकं असलेल्या अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे मारले आहेत. समीर स्वतः क्रिकेट आणि चित्रपटांचे मोठे चाहते आहेत. मात्र असे असूनही त्यांनी त्यांची आवड कामाच्या आड येऊ दिली नाही. समीर यांनीच कलाकारांनी त्यांचे सामान स्वतः उचलावे हा नियम काढला. कलाकारांचे कोणतेही सहायक त्यांचा सामान उचलणार नाही हा नियम अंमलात आणण्यासाठी कडक कारवाई केली.

Photo Courtesy: Instagram/kranti_redkar

समीर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या अभिनेत्री क्रांती रेडकरसोबत २०१७ साली लग्न केले. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत. समीर वानखेडे फक्त दोन सेलिब्रिटींना मानतात. पहिला सेलिब्रिटी म्हणजे अजय देवगण आहे, कारण तो कधीही टॅक्स भरण्यास नकार देत नाही आणि दुसरी व्यक्ती म्हणजे मराठी अभिनेत्री आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्टाने दिली एक दिवसाची एनसीबी कस्टडी

-क्रूझ ड्रग्ज पार्टीत शाहरुख खानच्या मुलाला घेऊन जाणारा अरबाज मर्चंट आहे तरी कोण?

-‘माझ्या मुलाने माझ्यासारखं न वागता…’, तर शाहरुखला आर्यनकडून होत्या ‘अशा’ विचित्र अपेक्षा

हे देखील वाचा