Saturday, June 29, 2024

‘मागे सरक…’ म्हणत सलमान खानची पापाराझींवर आगपाखड, नेटकरी म्हणाले, ‘ इतका राग…’

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. सलमान सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याचे लाखो चाहते आहेत. सलमान त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करत असतो. नुकताच त्याचा भाऊ अभिनेता सोहेल खानचा 53 वा वाढदिवस साजरा करण्यात आाला. या पार्टीनंतर सलमान खान (पापाराझींवर भडकल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमान खान ( Salman Khan ) त्याच्या आई-वडिलांबरोबर गाडीत बसण्यासाठी उभा आहे. यावेळी पापाराझी त्याच्या आजूबाजूला गर्दी करून त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढू लागतात. यामुळे सलमान खानचा राग अनावर होतो आणि तो पापाराझींना मागे सरकण्यास सांगतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी बोलताना सलमान खानचा आवाज इतका मोठा आहे की, तो व्हिडीओमध्ये स्पष्ट ऐकू येतो.

या व्हिडीओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक सलमान खानच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत. तर काही लोक त्याला टीका करत आहेत. एका युजरने कमेंट केली, “सलमान खानचं बरोबर आहे. पापाराझी नेहमी कलाकारांना त्रास देतात. त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात शांतता मिळायला हवी.” दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिले की, “सलमान खानला काय वाटते ते समजते. पण, त्याने इतका राग दाखवण्याची गरज नव्हती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर दिवाळीच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबरला त्याचा ‘’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 44.5 कोटींचा गल्ला जमावला आहे. मात्र, हळूहळू या चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे दिसून आले. मनीष शर्मा दिग्दर्शित, या चित्रपटात सलमान खान टायगरची भूमिका साकारत आहे तर कतरिना कैफ झोयाची भूमिका साकारताना दिसले.

आधिक वाचा-
8 Don 75 : संस्कृती बालगुडेच्या ‘8 दोन 75’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज; व्हिडिओ एकदा पाहाच
डीपनेक आउटफिटमध्ये ‘प्रियंका चोप्रा’ची किलर अदा, पाहा फोटो

हे देखील वाचा