Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

असे काय झाले? ज्यामुळे करण जोहर म्हणाला होता, ‘मी रणबीरला सोशल मीडियावर ब्लॉक करेल’

चित्रपट निर्माता करण जोहर बहुतेकदा त्याच्या चित्रपटांमुळे आणि घराणेशाहीच्या मुद्द्यांमुळे सतत चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. सतत त्याची खिल्ली उडवणारे मीम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. आज आम्ही तुम्हाला करण जोहरच्या एका मुलाखतीबद्दल सांगणार आहोत, ज्यात त्याने रणबीर कपूरला सोशल मीडियावर ब्लॉक करणार असल्याचे म्हटले होते. जाणून घेऊया की, करण जोहरने असे का म्हटले होते.

खरं तर, एका मुलाखती दरम्यान, करण जोहरला विचारले गेले होते की, “सोशल मीडियावर तुम्हाला आलिया भट्ट, जान्हवी कपूर आणि सारा अली खान यापैकी एकाला फॉलो, एकाला ब्लॉक, तर एकाला अनफॉलो करायचे असेल, तर ते कोण असतील?” या प्रश्नावर करण जोहरने स्पष्टपणे सांगितले की, मी या तिन्हीपैकी कोणासोबतच असे करणार नाही.

यानंतर हाच प्रश्न करण जोहरला बॉलिवूडचे तीन अभिनेते रणबीर कपूर, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यासाठी विचारला गेला. यावर प्रतिक्रिया देत करण जोहर म्हणाला होता की, “रणबीर सोशल मीडियावर नाहीये, म्हणून मी त्याला ब्लॉक करेल. मला वरुण धवनला अनफॉलो करायला आवडेल, कारण मी त्याला नेहमी फॉलो करतो आणि मी सिद्धार्थ मल्होत्राला फॉलो करेल.”

काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना २’ या चित्रपटातून काढून टाकल्यापासून करण जोहर बराच चर्चेत आला आहे. कार्तिक आणि चित्रपटांच्या निर्मात्यांमध्ये काही मतभेद झाले असल्याकारणाने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे म्हटले जात आहे. तसेच, यावर्षी करण जोहरचे ‘लायगर’ आणि ‘शेरशाह’ हे चित्रपट रिलीझ होणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे कोणाचे मूल हरवले?’, कार्तिक आर्यनने तोंड काळे झालेला फोटो केला शेअर; नेटकऱ्यांनी घेतली मजा

-‘एकच नंबर दिसतेय!’ ‘आर्ची’च्या साडीतील अदांनी पुन्हा लावले चाहत्यांना वेड; पडतोय लाईक्स अन् कमेंट्सचा मोठ्ठा पाऊस

-‘द कपिल शर्मा शो’मधील ‘ही’ अभिनेत्री आहे बेरोजगार; दीर्घकाळापासून लढतेय महाकाय आजाराशी

हे देखील वाचा