Wednesday, July 3, 2024

‘राज कुंद्रा लोकांसमोर का येत नाही?’, शिल्पा शेट्टीला प्रश्न विचारताच मिळालं ‘हे’ उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. तिचा आगामी सिनेमा ‘निकम्मा’च्या प्रमोशनसाठी तिने हा निर्णय घेतला असावा. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम झाला, ज्यामध्ये शिल्पासोबत चित्रपटाचे मुख्य कलाकार शर्ली सेटिया (Shirley Setia), अभिमन्यू दासानी (Abhimanyu Dasani) आणि दिग्दर्शक साबीर खान उपस्थित होते. मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी भाग्यश्रीही (Bhagyashree) पती आणि मुलीसह कार्यक्रमात सहभागी झाली होती.

ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर मीडियामध्ये प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू झाले आणि शिल्पाला तिचा पती राज कुंद्राशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न ऐकून आधी ती गप्प झाली. मग ती म्हणाली की काही हरकत नाही, ती या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईल. (why raj kundra hide his face in public places after pornography case)

शिल्पाला विचारला गेला ‘हा’ प्रश्न
खरं तर, शिल्पाला प्रश्न विचारण्यात आला होता की, “अलीकडे तू आणि तुझे कुटुंब खूप कठीण टप्प्यातून गेले आहे. त्यानंतर तू पुनरागमन केले आहेस आणि चित्रपट-टीव्हीमधील आगामी प्रोजेक्ट्सही खूप चांगले आहेत. त्या कठीण काळानंतरही तुझा पती राज कुंद्रा अजूनही लोकांसमोर आलेला नाही. या कठीण काळाने तुम्हाला किती त्रास दिला आणि जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला वाटते का की, हे सर्व किती कठीण आहे?”

अभिनेत्रीने दिले ‘हे’ उत्तर
उत्तरात शिल्पा म्हणाली, “मी या प्रश्नाचे उत्तर देईन… मला वाटते की, आज आपण सर्वजण एक नवीन सुरुवात साजरी करण्यासाठी सामील झालो आहोत. मी फक्त माझ्यासाठी बोलत नाही, तर माझे दिग्दर्शक साबीर खान, अभिनेता अभिमन्यू दासानी आणि शर्ली यांच्यासाठीही बोलत आहे. अशा वेळी माझ्या आयुष्याबद्दल बोललं पाहिजे असं मला वाटत नाही. हा प्रश्न चित्रपटाशी संबंधित असता, तर मी त्याचे उत्तर दिले असते. आता माझ्या आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दल बोलू, तर हो तो खूप कठीण काळ होता. या मंचावर बसलेल्या आपल्या सर्वांच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात. विशेषत: कोविड महामारीमुळे, गेली दोन वर्षे केवळ माझ्यासाठीच नाही, तर अनेक लोकांसाठी, चित्रपट उद्योगासाठी कठीण होती. कारण चित्रपटगृहे बंद होती आणि आम्ही तयार चित्रपट प्रदर्शित करू शकलो नाही.”

कठीण काळाबद्दल बोलली मोठी गोष्ट
अभिनेत्री पुढे म्हणाली, “आजचा दिवस खूप मोठा आहे. अभिमन्यूचा हा चित्रपट २ वर्षांपासून थिएटरसाठी तयार होता. साबीर, चित्रपटाचे दिग्दर्शक, शर्ली सेटिया या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहेत आणि माझ्यासाठी देखील माझा चित्रपट १४ वर्षानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. चला तर मग आज चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करूया. निकम्मा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तुम्ही मला सुपर वुमन अवतारात पाहिलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या खऱ्या आयुष्यातही कठीण प्रसंगांना तोंड देत मजबूत होतो. आपल्यापैकी बरेच जण आपल्या कठीण काळात खंबीरपणे उभे राहण्याबद्दल बोलत नाहीत, परंतु आपण सर्वजण वेगवेगळ्या परिस्थितीत खंबीरपणे बाहेर पडतो.”

‘निकम्मा’ची स्टारकास्ट
‘निकम्मा’मध्ये भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सुपरवुमनवर आधारित चित्रपट असेल, असे मानले जात होते. निर्मात्यांनी शिल्पाचा लुकही अशाच पद्धतीने रिलीझ केला. पण आता जेव्हा ट्रेलर रिलीझ झाला, तेव्हा गोष्ट वेगळी निघाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा