Monday, July 1, 2024

विकिपीडिया मावशींची ‘ही’ चूक ठरली जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यासाठी डोकेदुखी

आज काळ लहानातल्या लहान गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत कशाबद्दलही माहिती पाहिजे असल्यास सगळे लोकं लगेच गुगल करतात. प्रत्येक प्रश्नावर या गुगलकडे उत्तर आहे. अनेकदा मनोरंजनविश्वाबद्दल देखील मोठी माहिती या गुगलवरून घेतली जाते. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देखील गुगल अगदी लीलया देतो.

मात्र अनेकदा या गुगलवरून मिळणारी माहिती योग्यच असते नाही. अर्थात थोड्याफार फरकाने तिच्यात बदल नक्कीच पाहायला मिळतो. मात्र कधीकधी तारखांचा गोंधळ देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथे पाहायला मिळतो. अशा या तारखांच्या गोंधळामुळे अनेकदा कलाकारांना मोठ्या प्रमाणावर त्रास देखील होतो.

अशातच अनेकदा गुगलवरून आपल्या आवडत्या कलाकारांचे वाढदिवस देखील त्यांचे फॅन्स शोधताना पाहिले जाते. बहुतकरून कलाकारांचे वाढदिवस गुगलवरून मोठ्या प्रमाणावर शोधले जातात. मात्र त्यातही बरयाचदा तारखांचे घोळ पाहायला मिळतात. अशाच वाढदिवसाच्या तारखेचा घोळ झाला आहे, जेष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी यांच्यासोबत. त्यांचा वाढदिवस ३ मे ला असल्याचे गुगलवर दाखवले जाते , मात्र प्रत्यक्षत त्यांचा वाढदिवस त्या दिवशी नसतोच मुळी. खुद्द अरुणा यांनीच याबद्दल सर्वांच्या मानतील गोंधळ दूर केला आहे.

Aruna-Irani
Photo Courtesy: Instagram/arunairanikohli

विकिपीडियावर अरुणा ईराणी यांचा वाढदिवस चुकीचा लिहिले आहे. अनेक वर्ष झाली याला मात्र ते यात बदल करत नाही. नुकत्याच एका मोठ्या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार अरुणा यांनी सांगितले की, “इंटरनेटवर ३ मे हा माझा वाढदिवस दाखवल्या गेल्यामुळे मला या दिवशी अनेक फोन, मेसेज येत असतात. वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या जातात. मात्र माझा वाढदिवस ३ मे ला नसतो तर तो १८ ऑगस्टला असतो. याआधी देखील मी खूप वेळा माझ्या वाढदिवसाची तारीख बदलवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते का त्यात बदल करत नाही माहित नाही. मला मीडियाकडून देखील अनेकदा शुभेच्छा दिल्या जातात मी त्यांना देखील सांगते, मात्र काहीच फायदा नाही. मला अनेकदा खूप राग येतो आणि याचा त्रास देखील होतो.”

दरम्यान अरुणा यांनी बॉलिवूडमध्ये अतिशय उत्तम काम केले असून, त्या एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्कृष्ट डान्सर देखील आहे. त्यांनी ‘गंगा जमुना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांचे वडील एक ड्रामा कंपनी चालवायचे. तर आई एक अभिनेत्री होत्या. त्यांना चार भाऊ आणि दोन बहिणी आहेत.

अरुणा यांनी ‘बेटा’, ‘दूध का कर्ज’, ‘राजा बाबू’, ‘बॉबी’, ‘बॉम्बे टू गोवा’,‘गरम मसाला’, ‘नागीन’, ‘चरस’, ‘दयावान’, ‘शहेनशहा’, ‘फूल और कॉंटे’, ‘राजा बाबू’, ‘हसीना मान जायेगी’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अरुणा यांनी हिंदीसोबतच मराठी आणि गुजराती भाषांमध्ये देखील काम केले असून त्यांना दोनदा सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘TDM’ सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर, दिग्दर्शक म्हणाले, “अशा भेदभावामुळे माझी चित्रपट बनवण्याची… ”

‘नुकतेच मी माझे घर विकले’ आर्यन खानचा ब्रँड म्हणजे निव्वळ मस्करी, किंमती एकल तर हैराण व्हाल

हे देखील वाचा