Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड संजय लीला भन्साळींच्या ‘हीरा मंडी’तून रेखांना आऊट करून ऐश्वर्याची होणार का एन्ट्री?

संजय लीला भन्साळींच्या ‘हीरा मंडी’तून रेखांना आऊट करून ऐश्वर्याची होणार का एन्ट्री?

गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने घोषित केले होते की, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे ‘हीरा मंडी’ या वेब सीरिजसाठी त्यांचे सहयोग देणार आहेत. या वेब सीरिजमध्ये काम करण्यास तयार असलेल्या बाॅलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. अभिनेत्री ऐश्वर्य राय बच्चनच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

पुन्हा एकदा ऐश्वर्याने संजय भन्साळीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ऐश्वर्याने दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासोबत एका चित्रपटाचे शूटिंग संपवले आहे, तर सध्या अनेक चित्रपटांच्या डेट्स आहेत.

त्याचबरोबर भन्साळी ऐश्वर्यासोबत ‘हीरा मंडी’मध्ये काम करण्याच्या विचारात आहेत. तसेच या चित्रपटाच्या कास्टिंगबाबद अद्याप कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. या आधी ऐश्वर्याने ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’ या चित्रपटात संजय भन्साळीसोबत काम केले आहे.

अभिनेत्री ऐश्वर्य रायपूर्वी ‘हीरा मंडी’मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना घेण्याचा विचार संजय भन्साळी यांनी केला होता. परंतु रेखा यांच्यासोबत काम करणे कठीण असल्याचे ते म्हणाले. खरं तर दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यासोबतचे रेखा यांच्या अव्यावसायिक वर्तनाची माहिती मिळाल्यावर भन्साळी यांचा रेखासोबत काम करण्याचा आत्मविश्वास हलका झाला होता. ‘फितूर’ चित्रपटावेळी झालेल्या प्रकरणी भन्साळी प्रंचड नाराज झाले होते.

अशा परिस्थितीत संजय लीला भन्साळी आता कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाहीत. आता ते ऐश्वर्यासोबत काम करण्याची तयारी करत आहेत. अशातच सर्वकाही व्यवस्थित झाले, तर आता रेखा ‘हीरा मंडी’मध्ये येणार नाही, तर ऐश्वर्या संजय भन्साळींच्या चित्रपटात येईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss OTT: धमाकेदार वीकेंडमध्ये पाहुणे म्हणून येणार ‘सिडनाज’, पुन्हा एकदा पाहायला मिळणार त्यांची केमिस्ट्री

-अशी गाणी जी ऐकून तुमच्याही अंगावर येतील शहारे! ‘ए वतन’ ते ‘तेरी मिट्टी’सह ‘या’ गाण्यांसोबत साजरा करा स्वातंत्र्यदिन

-‘मानवतेचा उत्सव साजरा करूया’ म्हणत, प्रकाश राज यांनी ध्वजारोहण करत साजरा केला अमृतमहोत्सव स्वातंत्रदिन

हे देखील वाचा