टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात चर्चित आणि मोठा रियालिटी शो बिग बॉस पुन्हा एकदा गाजला आहे. नुकत्याच संपलेल्या बिग बॉस 19 च्या ग्रँड फिनालेमध्ये गौरव खन्ना विजेता ठरले. गौरवसोबत फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे यांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवले. गौरवच्या दमदार गेम आणि प्रेक्षकांच्या फॅन फॉलोइंगमुळे ट्रॉफी त्याच्याकडे गेली.
आता बिग बॉस 19 नंतर चाहत्यांचे लक्ष रोहित शेट्टी (Rohit Shetty)यांच्या स्टंट-आधारित रियालिटी शो ‘खतरों के खिलाड़ी’ कडे आहे. या शोचा 15वा सीझन लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. दरवर्षी बिग बॉसच्या कोणत्याही कंटेस्टंटला या शोमध्ये पाहायला मिळते, आणि यंदाही काहीतरी असंच होण्याची चर्चा आहे.
बिग बॉस 19 दरम्यान फरहानाने म्हटले होते की ती बिग बॉस नंतर रोहित शेट्टीच्या शोमध्ये भाग घ्यायला उत्सुक आहे. फिनालेनंतर मीडियाशी बोलताना तिने सांगितले की तिला मेकर्सकडून ऑफर मिळाली आहे आणि ती पुढील रियालिटी शोमध्ये सहभागी होण्यास तयार आहे.
फरहानाशिवाय प्रणित मोरे याही शोमध्ये सहभागी होण्याच्या चर्चेत आहेत.मीडियाशी बोलताना प्रणितने त्यांना हा रियालिटी शो खूप आवडतो आणि संधी मिळाली तर ते नक्की भाग घेतील. त्यांनी तरीही स्पष्ट केले की बिग बॉस त्यांच्या साठी मेंटली स्ट्रेसफुल होता, त्यामुळे त्या फॉरमॅटमध्ये लगेच परत जाणार नाहीत, पण दुसऱ्या फॉर्मॅटच्या शोमध्ये सहभागी होण्यास तयार आहेत.
बिग बॉस 19 च्या टॉप 3 मध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे होते. गौरव विजेता ठरला, तर फरहाना फर्स्ट रनरअप आणि प्रणित सेकंड रनरअप राहिले. शोदरम्यान फरहाना आणि प्रणित दोघांनाही प्रेक्षकांनी खूप पसंत केले. दोघेही टास्कमध्ये सक्रिय दिसले, ज्यामुळे त्यांची पॉपुलॅरिटी वाढली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया – भव्य पोस्टर प्रदर्शित










