Saturday, April 19, 2025
Home नक्की वाचा वैवाहिक जीवन आनंदात चालू असताना ‘गंगुबाई काठियावाडी’मुळे कपूर घराण्याची सून गोत्यात

वैवाहिक जीवन आनंदात चालू असताना ‘गंगुबाई काठियावाडी’मुळे कपूर घराण्याची सून गोत्यात

ज्या बहुप्रतिक्षित सिनेमानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. राव ‘मस्तानी’, ‘पद्मावत’ यांसारखे सुपरहिट सिनेमे बनवणाऱ्या संजय लीला भन्साळी यांनी. हा सिनेमा बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या करिअरमधला सर्वात मोठा सिनेमा आहे आणि यामुळे आलिया यशाच्या शिखरावर पोहोचेल, असं म्हणलं जात आहे. पण रिपोर्ट्स असं म्हणतायत की, या सिनेमामुळे आलियाचं बॉलिवूडमधलं मुख्य अभिनेत्रीचं जे करिअर आहे, तेच संपेल. एवढा मोठा सिनेमा, एवढी प्रसिद्ध अभिनेत्री, सिनेमाचं नाव. सर्वकाही मोठं आहे म्हणल्यावर आलियाचं नाव तर मोठंच झालं पाहिजे. मग त्यामुळं आलियाचं करिअर बर्बाद कसं काय होईल? यामागं जरा वेगळीच कारणं आहेत.

या इंडस्ट्रीत ज्या अभिनेत्रीनं सिनेमाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि तो सिनेमा गाजवलाय, त्या अभिनेत्रीसोबत कोणताच अभिनेता सिनेमात काम करायला तयार होत नाही. कारण त्यांना माहिती असतं की, अभिनेत्री असूनही तिचंच पात्र दमदार असेल, आमच्या पात्राला काही किंमतच नाही. त्यामुळे अनेक अभिनेते अशा अभिनेत्रींसोबत काम करत नाहीत. असंच काहीसं अभिनेत्री विद्या बालन हिच्यासोबतही घडलं आहे.

२०११ साली ‘सीरियल किसर’ इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, तुषार कपूर यांसारखी स्टारकास्ट असलेला ‘द डर्टी पिक्चर’ हा सिनेमा रिलीझ झाला होता. या सिनेमात विद्या बालन (vidya balan) झळकली होती. त्यानंतर आपण विद्या बालनला ‘कहाणी’ या सिनेमात पाहिलं. त्यानंतर एक काळ असा आला की, विद्या बालन सेंट्रिक सिनेमे बनू लागली. पण आजचा काळ असा आहे की, कोणत्याही अभिनेत्याला विद्या बालनसोबत काम करायचंच नाहीये. कारण तिच्या प्रत्येक सिनेमाची हिरो तर तीच असते. त्यामुळे आता विद्या सिनेमे तर करतेच, पण ते सिनेमे जे महिला केंद्रित असतात. ती रोमँटिक सिनेमे करतच नाहीये. कारण कोणत्याही अभिनेत्याला अशाप्रकारे साईड हिरो बनायचं नाहीये.

असंच काहीसं आहे ‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतबद्दल (kanagna ranaut). मागच्या काही काळापासून कंगना महिला केंद्रित सिनेमेच करतेय. एक-दोन सिनेमे स्वत:च्या हिंमतीवर काय केली, त्यामुळे आता तिच्यासोबत कोणत्याही हिरोला काम करायचं नाहीये. जो अभिनेता कंगनासोबत काम करेल, तो तिच्यापेक्षा कमी अनुभवी किंवा नवखा असेल, ज्याला स्क्रीन स्पेसची नाही, तर पात्राची भूक असेल. मेन स्ट्रीममधील कोणताही अभिनेता अशाप्रकारे काम करून साईड हिरो बनणार नाही.

कंगनासारखंच काहीसं अभिनेत्री तापसी पन्नूचंही (taapasee pannu) आहे. तीदेखील महिला केंद्रित सिनेमे करताना दिसतेय. २०२१ साली प्रदर्शित झालेला ‘हसीन दिलरुबा’ या सिनेमात ती दिसली होती. आता सिनेमाचं नावंच ‘हसीन दिलरुबा’ आहे म्हणल्यावर कथाही तिच्याच भोवती फिरणार. त्यामुळे कोणता मोठा अभिनेता तिच्यासोबत काम करेल ना आणि हो हा सिनेमा अनेक मोठ्या अभिनेत्यांना ऑफर करण्यात आला होता. पण सर्वांनी थेट नकार कळवला. या सिनेमात अभिनेता विक्रांत मेस्सीला घेण्यात आलं. विक्रांत महिला केंद्रित सिनेमात साईड हिरो बनूनही काम करतो. असंच काहीसं त्याने अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत ‘छपाक’ या सिनेमात केलं होतं. आता दीपिका किती मोठी अभिनेत्री आहे हे तर सगळ्या जगाला माहितीये. जेव्हा तिनं महिला केंद्रित सिनेमात काम करायचं ठरवलं, तेव्हा मोठ्या अभिनेत्यांनी ‘छपाक’ सिनेमाची ऑफर नाकारली. त्यामुळे या सिनेमात विक्रांत मेस्सीला घेण्यात आलं.

आता आपण ज्या अभिनेत्रींबद्दल बोललो, त्यांच्यासारखंच आलियाचंही होऊ शकतं. ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा केल्यानंतर जर तो हिट झाला, तर हे सिद्ध होईल की, आलियाची ब्रँड व्हॅल्यू ही कोणत्याही अभिनेत्यापेक्षा जास्त आहे. आणि तिला आपला सिनेमा चालवण्यासाठी कोणत्याही मेन स्ट्रीम हिरोची गरज पडत नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

श्वास रोखून धरा! प्रभास घेऊन येतोय बिग बजेट सिनेमे, आकडे वाचून फिरतील डोळे

संगीतविश्व समृद्ध करणारे संगीतकार अजय- अतुल, वाचा त्यांचा संपूर्ण प्रवास

‘साई तुझं लेकरू’ ‘टाइमपास ३’मधील पहिले धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा