बॉलिवूडचा बादशाह शाहरुख (shahrukh khan) सध्या ‘डंकी’च्या यशाचा आनंद घेत आहे. या वर्षात तीन बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता किंग खानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
शाहरुख खान आता ‘धूम’ फ्रँचायझीच्या चौथा चित्रपट ‘धूम ४’चा भाग बनणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरली आहे. धूम 4 मध्ये शाहरुख खानच्या एन्ट्रीच्या बातमीने चाहत्यांचा उत्साह गगनाला भिडला आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी दावा केला आहे की, ‘धूम 4’साठी शाहरुख खानला फायनल करण्यात आले आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, शाहरुख खान अभिनीत ‘धूम 4’ मध्ये असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. रिपोर्टनुसार, सध्या या चित्रपटावर काम सुरू असून चित्रपटाच्या कास्टिंगबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
SRK in #Dhoom4 will be the greatest thing ever happend & its confirmed ???????? @iamsrk #ShahRukhKhan
pic.twitter.com/D8YDC6dvso— Maddie???????? (@__emptinesss) December 27, 2023
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘धूम 4’मध्ये शाहरुख खानसोबत साऊथचा सुपरस्टार राम चरण यांच्या कास्टिंगचीही चर्चा होती. मात्र यशराज फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
जय गढवी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या फ्रँचायझीचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. पहिल्या भागात अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, रिम्मी सेन आणि ईशा देओल मुख्य भूमिकेत होते. तर 2006 मध्ये धूम 2 मध्ये अभिषेक बच्चनसोबत हृतिक रोशन, ऐश्वर्या राय बच्चन आणि बिपासा बसू दिसले होते. त्याचा तिसरा भाग ‘धूम 3’ मध्ये आमिर खान, अभिषेक बच्चन आणि कतरिना कैफ होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अखेर एक्स पतीच्या दुसऱ्या लग्नावर दुःखद मनाने मलायका अरोराने सोडले मौन; म्हणाली, ‘मी रोज..’
खुशखबर ! मुन्नाभाईच्या कॉमेडीचा तडका पुन्हा एकदा अनुभवता येणार, वाचा काय म्हणाले दिग्दर्शक ?