Monday, July 1, 2024

अभिनयाचे मैदान गाजवण्यासाठी उतरलेल्या ‘या’ अभिनेत्याचा बालपणीचा फोटो व्हायरल, सुनील शेट्टीशी आहे जवळचा संबंध

आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मग ते त्यांचे आगामी चित्रपट असो किंवा बालपणीचे फोटो. अलीकडच्या काळात बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेषतः चाहत्यांना त्यांचे बालपणीची फोटो पाहायला खूप आवडतात. आजकाल असे दिसत आहे की, सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू झाल्याप्रमाणे फॅन पेज त्यांच्या आवडत्या कलाकारांचे फोटो पोस्ट करून त्यांना ओळखण्याचे आव्हान देतात. अनेक कलाकारांचे फोटो पाहून चाहत्यांना ते खरोखरच त्यांचे आवडते कलाकार असल्याचा अंदाज लावणे कठीण जात होते. अशातच एका कलाकाराच्या मुलाचा फोटो समोर आला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) मुलगा अहान शेट्टीचा (Ahan Shetty) पहिला चित्रपट ‘तडप’ शुक्रवारी (३ डिसेंबर) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता ‘तडप’च्या प्रदर्शनाच्या निमित्ताने सुनीलने त्याचा मुलगा अहानचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘तडप’ चित्रपटात काम करणारा अहानच आहे हे फोटोंमध्ये ओळखणे कठीण होत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सुनील शेट्टीने फोटो शेअर करून लिहिले की, “अहान! तुझा पहिला शुक्रवार. तुझा पहिला चित्रपट प्रदर्शित. तडप येथे आहे आणि तो दुसऱ्या दिवशीही चालेल. जसे जसे चित्रपट चमकतात, तसे ते एक मैलाचा दगडात बनतात, पण एक लक्षात ठेवा. जर तुम्ही प्रामाणिक असाल, तर लोक प्रामाणिक आहेत. ते तुमच्यावर टीका करतील, तर ते मनावर घेऊ नका, हा एक धडा आहे.” सुनीलने आपल्या फिल्म इंडस्ट्रीचा अनुभव मुलगा अहानसोबत शेअर केला आहे.

सुनील शेट्टीने ऍक्शन हिरो म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्याने ‘बलवान’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. आज तो अभिनेता असण्यासोबतच एक यशस्वी उद्योगपतीही आहे. ‘बलवान’, ‘वक्त हमारा है’, ‘पहचान’, ‘दिलवाले’, ‘अंत’, ‘मोहरा’, ‘गोपी किशन’, ‘हम हैं बेमिसाल’, ‘सुरक्षा’, ‘रघुवीर’, ‘गद्दार’, ‘टक्कर’, ‘एक था राजा’, ‘विश्वासघात’ आणि ‘कृष्णा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सुनील शेट्टीने काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नांच्या चर्चांमध्ये कॅटरिना क्लिनिकबाहेर स्पॉट, नेटकरी म्हणाले, ‘लग्नाआधीच प्रेग्नंट झाली की काय?’

-धक्कादायक! अं’मली पदार्थ तस्कराचा पाठलाग चुकवताना प्रसिद्ध माॅडेलचा भीषण अपघात, उपचारादरम्यान मृत्यू

-जुही चावलाने सांगितले केकेआर सामना हरल्यानंतर काय करतो शाहरुख खान

हे देखील वाचा