Sunday, June 22, 2025
Home साऊथ सिनेमा बोल्ड एँड ब्युटीफुल! डोळा मारून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या प्रिया प्रकाश वारियरच्या टॉपलेस फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

बोल्ड एँड ब्युटीफुल! डोळा मारून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या प्रिया प्रकाश वारियरच्या टॉपलेस फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

तुम्हाला मागच्या काही वर्षात एक डोळा मारणाऱ्या मुलीचा व्हायरल झालेला व्हिडिओ आठवतच असेल. जिने आपल्या या अंदानी चाहत्यांना अक्षरश: घायाळ केले होते. काही सेकंदाचा असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. याच व्हिडिओने डोळा मारणाऱ्या मुलीला म्हणजेच अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. सोशल मीडियावर सेन्सेशन बनलेल्या प्रियाला सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.

प्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. बऱ्याचदा ती तिचे अनेक फोटो, व्हिडिओ पोस्ट करताना दिसत असते. नुकतेच प्रियाने तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवरील आतापर्यंतच्या फोटोंमध्ये सर्वात जास्त बोल्ड आणि ब्युटीफुल ठरले आहेत.

तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये प्रिया टॉपलेस दिसत असून, तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा प्रियाच्या सौंदर्याला चार चाँद लावत आहेत. प्रियाचे हे हॉट फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडत असून, यावर त्यांच्या एकापेक्षा एक अशा कमेंट्सदेखील येत आहेत.

सध्या प्रिया तिच्या आगामी तेलुगु सिनेमा ‘क्रॅक’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रिया तेलुगु चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. प्रियासोबत या सिनेमात अभिनेता नितीन झळकणार असून, या सिनेमाचे शूटिंग सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्रियाने या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून तिचा एक व्हिडिओ इंस्टावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये प्रिया एक सीन करताना दिसत आहे. ज्यात तिला मागून पळत येऊन नितीनच्या पाठीवर बसायचे असते. मात्र, हा सीन करताना प्रिया पळत तर येते पण ती जोरात पडते. तेवढ्यात तिला सर्व क्रू मेंबर सावरतात.

हा व्हिडिओ शेअर करताना प्रियाने लिहिले की, “माझे जीवन मला कसे धाराशाही करते ही त्याची एक झलक आहे. मात्र मी नेहमीच उभी राहते आणि विश्वासाने पुढे जाते.”

प्रियाने आतापर्यंत मोजकेच चित्रपट केले आहेत, पण यामध्ये तिच्या भूमिकेने तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने ‘ओरू अदार लव्ह’, ‘चेक’, ‘विष्णू प्रिया’, ‘थानहा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा