Wednesday, June 26, 2024

बेशरम रंग गाण्यावर थिरकली ‘विंक गर्ल नॅशनल क्रश’, पाहा व्हायरल व्हिडिओ

अभिनेता शाहरुख खान मोस्ट अवेटेड चित्रपट पठाण मधील बेशरम रंग गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. गाण्यामध्ये दीपिका पादुकोन हिने घातलेली भगव्या रंगाची बिकीनीमुळे हिंदी धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप अनेक हिंदु संघटनांना केला होता. त्यामुळे पठाण चित्रपटाला बॉयकॉट करण्याचे सोशल मीडियावर अधिवेशन सुरु होते मात्र, तरिही अनेकांनी या गाण्यावर भगव्या रंगाचे कपडे परिधान करुन व्हिडिओ शेअर केले होते. आता यामध्येच साउथमधाील प्रिसिद्ध अभिनेत्री प्रिया वारियर हिने व्हिडिओ शेअर केला असून सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

‘विंक गर्ल’ म्हणून प्रकाशझोतात आलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया वारियर (Priya Warrier) हिने नुकतंच बेशरम रंग (Besharam Rang) गाण्यावर व्हिडिओ बनवला असून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रिया बेशरम रंग गाण्याचा अस्वाद घेताना दिसून येत आहे. पठाण (Pthan)चित्रपटातील हे गाणं वादाच्या घेऱ्यात जरी आलं असलं तरी अनेक अभिनेत्री आणि सोशल मीडिया इनफ्लुएंसरला थिरकाताना पाहिलं आहे. आणि आत प्रियाने देखिल तिचा भन्नाट व्हिडिओ शेअर केला जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रिया बेशरम रंग हे गाणं गातानाचा व्हिडिओ आपल्या अधिकृत इस्टग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. प्रियाचा आवाज आणि तिने ज्या पद्धतीने हे गाणं गायलं आहे ते पाहूण चाहते प्रियाच्या प्रेमात पडले असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या मते तिने मुळ गाण्यापेक्षाही जास्त चांगलं गायलं आहे. तिने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘या गाण्याच्या प्रेमाखातर..’

 

View this post on Instagram

 

चित्रपटातील एका सीनमुळे प्रिया रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती. त्याशिवाय तिला ‘विंक गर्ल’ नॅशनल क्रश असंही नाव चाहत्यांनी दिलं होतं. प्रिययाने काही दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केलं आहे. तिला त्या व्हिडिओ क्लीपमुळे अमाप प्रसिद्धी मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माेठा खुलासा! शोमध्ये टेलिप्रॉम्प्टरवर पाहून कपिल शर्मा सांगताे जाेक्स; युजर्स म्हणारले, ‘आमचे पंतप्रधान…’
काय सांगता! ट्विंकलला मारण्यासाठी आमिर खानने चक्क उचलला हात, वाचा संपुर्ण किस्सा

 

हे देखील वाचा