Sunday, April 14, 2024

खळबळजनक! ‘पठाण’वर कमेंट करताच दिग्दर्शक अडचणीत, नेटकऱ्यांकडून मुलीचे ‘भगव्या’ बिकिनीतले फोटो व्हायरल

शाहरुख खान याच्या ‘बेशरम रंग‘ हे गाणे वाद निर्माण करणारे. नेटकऱ्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी या गाण्यावर भावना दुखावल्याचे आरोप केले आहेत. या गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती, ज्यामुळे या वादाला तोंड फुटले. या गाण्यावर टीका करणाऱ्यांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचाही समावेश होता. त्यांनी ‘पठाण‘ सिनेमाबद्दल अशी काही कमेंट केली की, ज्यामुळे नेटकरी आता त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. विशेष म्हणजे, काही युजर्सनी अग्निहोत्रींच्या मुलीचे भगव्या रंगाच्या बिकिनीतील फोटो व्हायरल केले आहेत.

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी नुकतेच ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमावर टीकास्त्र डागत एक ट्वीट केले होते. त्यात ते म्हणाले होते की, “तुम्ही धर्मनिरपेक्ष असाल तर हे पाहू नका.” इतकेच नाही तर यात त्यांनी ‘पठाण’च्या ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्याची टीका करत एका छोट्या मुलीचा व्हिडिओही ट्वीट केला होता. व्हिडिओत ती मुलगी या गाण्याला ‘लैंगिक अत्या’चारासाठी उकसवणारे’ म्हणत होती. विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या या ट्वीटवर लोक भडकले आहेत आणि त्यांनी दिग्दर्शकाच्या मुलीचे भगव्या रंगातील फोटो व्हायरल केला आहे.

भगव्या रंगाच्या बिकिनीत मल्लिका अग्निहोत्री
या फोटोंमध्ये मल्लिका अग्निहोत्री (Mallika Agnihotri) हिने त्याच रंगाची बिकिनी परिधान केली आहे, ज्या रंगाची बिकिनी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने ‘बेशरम रंग’ गाण्यात परिधान केली होती. याबाबत आता युजर्स विवेक अग्निहोत्री यांच्यावर निशाणा साधत आहेत. एकाने त्यांच्या मुलीचा बिकिनीतील फोटो शेअर करत लिहिले की, “विवेक अग्निहोत्री इतर अभिनेत्रींच्या बिकिनीतील फोटोंनी चिंतेत आहेत आणि इकडे पाहा त्यांच्या मुलीचे बिकिनीताल फोटो.”

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “आता हा विवेक अग्निहोत्री शाहरुख खान (Shahrukh Khan) याला कधीच ट्रोल करणार नाही. कारण, त्याची स्वत:ची मुलगीच त्याच्या दुटप्पीपणाची किंमत सहन करत आहे. तो त्याच्याच मुलीचा होऊ शकत नसेल, तर दुसऱ्यांचा कसा होईल. निर्लज्ज वडील.”

विवेक अग्निहोत्रीच्या मुलीने खासगी केले अकाऊंट
विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचे भगव्या रंगाच्या बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशात युजर्स त्यांच्यावर राग व्यक्त करत विचित्र कमेंट्स करत आहेत. एकाने असेही म्हटले आहे की, “ज्ञान वाटण्यापूर्वी घरातही द्या. देवाचा अपमान हिंदुस्तान सहन करणार नाही.”

या वादामध्येच आता त्यांची मुलगी मल्लिका अग्निहोत्री हिने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट खासगी केले आहे. दुसरीकडे, विवेक अग्निहोत्री यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाहीये. अशात ते याविषयी काही बोलतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (director vivek agnihotri troll and his daughter mallika orange bikini pics viral after his comment on besharam rang)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वत:च्या बहिणीशीच मलायकाने केले कडाक्याचे भांडण; भावूक होऊन म्हणाली, ‘जेव्हा गरज होती तेव्हा तू…’
ऐश्वर्या शेर, तर लेक सव्वाशेर! उंचीमध्ये थेट आईला टक्कर देतेय आराध्या, व्हिडिओ पाहून उंचावतील भुवया

हे देखील वाचा