Tuesday, June 25, 2024

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्या कधीही केले नाही रंगभूमीवर काम, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता

प्रसिद्ध विनोदी अभिनेते म्हणून लक्ष्मीकांत बेर्डेंची ओळख आहे. जरी ते आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी केलेल्या सिनेमांमधून ते आजही प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवतात. त्यांचे सिनेमे आजही प्रेक्षकांचे आजही मनोरंजन करतात. त्यामुळेच मराठी मनोरंजन विश्वातील विनोदाचे बादशहा अशी त्यांची ओळख आहे. त्याच्या मृत्यूनंतरही ते सतत चर्चेत येत असतात.

त्याच्या मृत्यूनंतर अभिनेती दीपक शिर्के यांच्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. दीपक शिर्के यांची ‘धडाकेबाज’ मधली बाप्पाची भूमिका प्रचंड गाजली होती. मात्र, त्याच्या करिेअरची सुरुवातच लक्ष्मीकांत यांच्या मदतीच्या हाताने झाली होती. पण लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूनंतर दीपक शिर्के कोलमडून पडले होते. त्यावेळीचा एक किस्सा त्यांनी शेअर केला आहे.

जुन्या आठवणीना उजाळा देत ते म्हणाले की, लक्ष्मीकांत म्हणजे लाख माणुस. माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांचे खूप म्हत्वाचे स्थान आहे. असा कोणाताच दिवस नाही ज्या दिवशी त्यांची मला आठवण येता नाही. लक्ष्मीकांत चित्रपटाच्या सेटचा जीव असायचा. धिंगाणा, मस्ती आणि खाऊ घालण्याच्या लक्ष्मीकांत यांना खूप शौक होता. मोठा राॅयल माणूस.

पुढे ते म्हणाले की, ‘टूर टूर’ हे नाटक फक्त आणि फक्त लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मला मिळालं होतं. या नाटकापुर्वी मी कधीच काॅमेरा हा प्रकार हाताळला नव्हता. त्यामुळे मला प्रचंड भियी वाटत होती. पण त्यावेळी मला टीमने सांभाळून घेतले आणि लक्ष्मीकांतमुळे मी मला तो रोल करता आला. पण ते गेले आणि मी रंगभूमीपासून लांब पडलो.

दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे रुपेरी पडद्यावर चमकले, पण लवकरच ते सर्वांच्या नजरेतून दिसेनासा झाले. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी वयाच्या 50 व्या वर्षी एका गंभीर आजाराशी झुंज देत जगाचा निरोप घेतला. त्यांना किडनीचा त्रास होता.16 डिसेंबर 2004 रोजी या महान अभिनेत्याचे निधन झाले. (With the departure of Laxmikant Berde, Deepak Shirke was away from the theatre)

हे देखील वाचा