Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड ‘त्यांना क्रिकेटची काय समज असेल..’ हरभजन सिंगने अनुष्का आणि अथियावर केलेली कमेंट पडली महागात

‘त्यांना क्रिकेटची काय समज असेल..’ हरभजन सिंगने अनुष्का आणि अथियावर केलेली कमेंट पडली महागात

सध्या केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींनाही २०२३ च्या वर्ल्ड कपचे वेड लागले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला. जिथे शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी सारखे स्टार्स टीम इंडियाला सपोर्ट करायला आले होते. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि फिरकीपटू हरभजन सिंगने अनुष्का आणि अथियाबाबत वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या खळबळ उडाली आहे.

वास्तविक, कमेंट करताना हरभजन सिंगने विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि केएल राहुलची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. त्याचं झालं असं की, मॅचदरम्यान कॅमेरा अनुष्का आणि अथियाकडे लागला तेव्हा दोघेही एकमेकांशी बोलताना दिसले. ज्यावर हरभजन सिंग म्हणाला होता, “मला वाटतं की कदाचित या दोघी चित्रपटांबद्दल बोलत असतील… कारण अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नसेल.”

हरभजन सिंगच्या या वक्तव्यामुळे आता यूजर्स त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. एका यूजरने तर क्रिकेटरने माफी मागावी अशी मागणीही केली आहे. युजरने लिहिले, “@harbhajan_singh तुम्हाला काय म्हणायचे आहे की महिलांना क्रिकेट समजते की नाही? कृपया त्वरित माफी मागावी. तर दुसर्‍याने लिहिले, “मी आतापर्यंत ऐकलेली ही सर्वात घृणास्पद गोष्ट आहे..”

शाहरुख खान, गौरी खान, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, आयुष्मान खुराना, सुहाना खान, आर्यन खान, अबराम खान, शनाया कपूर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील टीम इंडियाला चिअर करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत अमित शहाही दिसले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मोठया मनाचा खान, शाहरुख खानने विश्वचषक फायनलदरम्यान आशा भोसले यांचा उचलला चहाचा कप व्हिडिओ व्हायरल
World Cup 2023 | भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यासाठी ‘या’ कलाकारांनी दिली हिंमत, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा