जगातील सर्वात तरुण गायक आणि ‘बिग बॉस 16’ फेम अब्दू रोजिक (Abdu Rozik) त्याच्या लग्नाच्या बातमीने चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायक 7 जुलै रोजी लग्न करणार आहे. असा दावा केला जात आहे की अब्दू शारजाह येथील एका अमीराती मुलीशी लग्न करणार आहे. सोशल मीडियावर अशा बातम्या आल्यापासून सर्वत्र अब्दुची चर्चा होत आहे.
अब्दु रोजिक भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. तो जगातील सर्वात तरुण गायक आहे. अब्दूने भारतातही त्याचा म्युझिक अल्बम लाँच केला होता, जो लोकांना खूप आवडला होता. त्याचवेळी अब्दू रोजिक ‘बिग बॉस 16’ चा भाग बनला आणि प्रेक्षकांनी त्याला खूप पसंती दिली.
आपल्या निरागसपणा आणि खोडकर शैलीमुळे अब्दू सलमान खानसोबतच प्रेक्षकांचाही लाडका झाला. अब्दूचे भारतातही अनेक चाहते आहेत. जेव्हापासून त्यांच्या लग्नाची बातमी त्यांच्या चाहत्यांना मिळाली, तेव्हापासून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते अब्दुचे अभिनंदन करत आहेत.
अब्दू रोजिकने सांगितले आहे की तो त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्न करणार आहे, जी एमिराती मुलगी आहे. या तरुणीचे नाव अद्याप समजू शकले नसले तरी ती काही काळापासून त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
स्टरडम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल असा राखते दीपिका पदुकोण, जवळच्या व्यक्तीने केला खुलासा
मेट गालामध्ये सुंदर अंदाजात अवतरली आलिया भट्ट, कानामागे लावला काळा टिक्का