Wednesday, July 3, 2024

लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुखचा नाशिक-मुंबई हायवेवर अपघात, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक, संवाद लेखक आणि नाटककार असणाऱ्या प्राजक्त देशमुख यांचा शुक्रवारी मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात झाला. ही घटना भिवंडी फाट्याजवळ घडली. सुदैवाने प्राजक्त सुरक्षित असून, त्याने स्वतः या घटनेचा या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. यामध्ये त्याने अपघात कसा घडला आणि त्यानंतर काय झाले यासोबतच त्याच्या गाडीचा देखील फोटो, व्हिडिओ शेअर केला आहे.

प्राजक्तने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात.भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो.मी सुखरुप आहे.परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लाऊन दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम?”

पुढे प्राजक्तने लिहिले, “ट्रकने ब्लॅाक उडवला म्हणजेच तो उजवीकडून चालत होता.अवजड वाहन हायवेला डावीकडून चालणं अपेक्षित असतांना अत्यंत बेजबाबदारपणे हे घडलं. शिवाय ट्रकवाला न थांबता पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाशिक मुंबई हायवेवर जीव मुठीत धरुन गाड्या चालवा. जपा.”

तत्पूर्वी प्राजक्तने २०१७ साली ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक रंगभूमीवर आणले. या नाटकाला तुफान प्रतिसाद मिळला. पुढे प्राजक्तने मागच्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘गोदावरी’ आणि ‘वेड’ या सिनेमाचे संवाद लिहिले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
जितेंद्र जोशींच्या ‘गोदावरी’ सिनेमाच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा, SCO फिल्म फेस्टिवलमध्ये पटकावला पुरस्कार

नेहमीच बोल्ड अवतारात दिसणाऱ्या दिशाने एथनिक आऊटफिटमध्ये वेधले चाहत्यांचे लक्ष

हे देखील वाचा