Friday, July 5, 2024

बापरे… एवढं महाग! करवाचौथला यामीने घातलेल्या मंगळसूत्राची किंमत माहितीये का? वाचून सरकेल पायाखालची जमीन

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्याने चाहत्यांना पुरते घायाळ केले आहे. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे यामी गौतम होय. अभिनयाव्यतिरिक्त यामी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती यावर आपले वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्यावर पारंपारिक ड्रेस असो किंवा वेस्टर्न ड्रेस, यामीवर सर्व ड्रेस शोभून दिसतात. तिचा ड्रेसिंग सेन्स कमालीचा आहे. कोणत्या सणाला काय परिधान करायचे, याची तिला चांगली माहिती आहे. नुकतेच आपल्या पहिल्या करवाचौथला यामीने बनारसी साडी नेसली होती. यावर तिने घातलेल्या मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधले. या वेशभूषेतील तिचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

याचवर्षी म्हणजेच ४ जून, २०२१ यामीने दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासोबत संसार थाटला होता. लग्नानंतरचा हा यामीचा पहिलाच करवाचौथ होता. त्यामुळे तिने या खास क्षणी पारंपारिक बनारसी साडी नेसली होती. यासोबतच तिने लिपस्टिक आणि टिकली लावली होती. या पेहरावात ती खूप सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे, या सर्वांमध्ये तिच्या मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधले होते.

यामीने बल्गरीचे मंगळसूत्र घातले होते. या मंगळसूत्राची किंमत तब्बल ३ लाख ४९ हजार रुपये इतकी आहे.

अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत यामीने लिहिले आहे की, “हा माझा पहिलाच करवाचौथ आहे आणि अजूनही खास झाला आहे. कारण मी बल्गरी मंगळसूत्र घातले केले आहे.”

यामीने या पेहरावामध्येच पती आदित्यसोबत आपला पहिला करवाचौथ साजरा केला आहे.

यामीला भारतीय वेशभूषा खूपच आवडते. काही दिवसांपूर्वीही तिने सणांच्या सुरुवातीला सलवार कमीझ परिधान केले होते. तसेच कानात तिने त्याच रंगाचे इअरिंग घातले होते. हेच तिने करवाचौथच्या वेळीही घातले होते.

यामीला बनारसी साडी खूपच आवडते. नुकतीच तिने जांभळ्या रंगाची बनारसी सिल्क साडी नेसली होती. विशेष म्हणजे, ‘भूत पोलीस’ चित्रपटाच्या शूटिंगवेळीही यामीने बटन डाऊन स्कर्ट परिधान केली होती. यासोबत तिने क्रॉप टॉप घातला होता.

यामीच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘भूत पोलीस’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिच्यासोबत सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस या कलाकारांच्याही मुख्य भूमिका होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आम्हाला मारून टाकण्याच्या धमक्या येतायेत…’, पत्रकार परिषदेत क्रांतीने केला पती वानखेडेंच्या आरोपावर पलटवार

-आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी, बेल मिळेल की पुन्हा कोठडी?

-भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण

हे देखील वाचा