सध्या सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’चे तिसरे पर्व सुरू झाले आहे. यामध्ये अनेक कलाकार आपली हजेरी लावत आहेत. हा शो सध्या आवडत्या शोच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर सर्वच कलाकार चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावतात. याच दरम्यान या आठवड्यात ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये ‘भूत पोलीस’चे कलाकार आपली हजेरी लावणार आहेत. शोमध्ये आलेले सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस हे कलाकार सेटवर खूप मजा आणि मनोरंजक खुलासे करताना दिसतील. याच दरम्यान, कपिल शर्माने यामी गौतमच्या हनिमून प्लॅनबद्दल खुलासा केला, ज्यामुळे सैफला देखील आश्चर्य वाटले.
निर्मात्यांनी या एपिसोडचा प्रोमो रिलीझ केला आहे. ज्यात कपिल शर्मा यामी गौतमला म्हणतो की, “यामी, आम्ही एका मुलाखतीत ऐकले की तू आणि आदित्य हनीमूनला सहपरिवार जाणार आहात. तुम्हाला कोणी सांगितले नाही की कुटुंब तिथे जाऊन बनवतात.” हे ऐकून अर्चना पूरन सिंग आणि जॅकलिन फर्नांडिससह सर्वजण हसायला लागले. (yami gautam honeymoon plan with family shocks saif ali khan in the kapil sharma show this is how he reacted)
यावर यामी म्हणते की, “आमच्या दोघांची एक अट होती की, सगळे एकत्र जातील.” हे ऐकून सैफ स्तब्ध होतो आणि विचारतो, “खरंच?” यामी यावर “हो” असे उत्तर देते.
यामी गौतमने ४ जून २०२१ रोजी ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर सोबत लग्न केले. त्याचबरोबर सैफने त्याच्या आयुष्याशी आणि लग्नाशी संबंधित अनेक मजेदार किस्सेही सांगितले. सैफने सांगितले की, तो महागड्या लग्नाला घाबरतो आणि म्हणूनच त्याच्या ४ मुलांच्या लग्नाबद्दल काळजीत आहे. या कलाकारांनी कपिलच्या शोमध्ये खूप मज्जा मस्ती केली.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स
-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन
-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…