Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड कॅमेऱ्यासमोर कंगना रणौतची नक्कल करताना दिसली यामी गौतम, म्हणाली ‘असे’ काही

कॅमेऱ्यासमोर कंगना रणौतची नक्कल करताना दिसली यामी गौतम, म्हणाली ‘असे’ काही

अभिनेत्री यामी गौतमला (Yami Gautam) तिच्या सुंदर स्टाईलसाठी पसंत केले जाते. चाहते यामीला प्रतिभेसह सौंदर्याचा टॅग देऊन तिचे कौतुक करत असतात. या अभिनेत्रीने चित्रपटांच्या माध्यमातून पडद्यावर अनेक प्रकारची व्यक्तिरेखा साकारली आहे. अशातच आता आम्ही तुमच्यासाठी यामीचा लपलेला टॅलेंट व्हिडिओ घेऊन आलो आहोत. अभिनेत्रीची ही प्रतिभा तिच्या चाहत्यांना फारशी माहितीही नसेल.

यामीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिचे मिमिक्री कौशल्य दाखवताना दिसत आहे. विशेष म्हणजे यामीने मिमिक्रीसाठी कंगना रणौतची (Kangana Ranaut) निवड केली. यामी गौतम या व्हिडिओमध्ये कंगनाची नक्कल करताना दिसत आहे आणि अभिनेत्रीने आपल्या कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. व्हिडिओमध्ये यामी कंगनाच्या बोलण्याच्या स्टाइलची कॉपी करताना दिसत आहे. (yami gautam mimicrying kangana ranaut speaking style yami gautam kangana mimicry video goes viral)

https://www.facebook.com/watch/?v=485147959024572

यामी गौतमला तिच्या पारंपरिक लूकसाठी सर्वाधिक पसंती दिली जाते. तिला अनेकदा पॅपाराझींनी तिला स्पॉट केले आहे. तिचे असे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात तिचा साधेपणा सर्वांना प्रभावित करतो.

यामी इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे आणि तिच्या फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आघाडीशी संबंधित अपडेट्स देत असते. यामीच्या पोस्टवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स येत असतात. यासोबतच अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवरही चांगले फॅन फॉलोव्हर्स आहेत.

सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खूप चांगल्या टप्प्यातून जात आहे. गेल्या वर्षीच यामीने चित्रपट निर्माता आदित्य धरसोबत लग्न केले आणि ती तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. यामी आणि आदित्यची जोडी चाहत्यांना खूप आवडते. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्रीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘अ थर्सडे’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा