Monday, July 1, 2024

दुःखद! यश चोप्रा यांच्या पत्नी आणि जेष्ठ गायिका पामेला चोप्रा यांचे निधन

बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते असणाऱ्या दिवंगत यश चोप्रा यांची पत्नी आणि गायिका पामेला चोप्रा यांचे निधन झाले आहे. २० एप्रिल रोजी सकाळी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पामेला या प्रसिद्ध गायिका होत्या. यासोबतच त्या फिल्म रायटर आणि निर्मात्या देखील होत्या.

मीडियामधील एका रिपोर्ट्सनुसार मागील १५ दिवसांपासून मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मात्र त्यांच्या तब्येतीमध्ये काहीच सुधार नव्हता. यातच आज त्यांचे निधन झाले आहे. मिळणाऱ्या माहितीनुसार पामेला यांचे निधन निमोनिया, श्वसनाला त्रास आणि मल्टीऑर्गन फेल्योर मुळेच झाले आहे.

पामेला यांची ओळख एक लेखिका आणि एक गायिका म्हणून होती. त्यांनी कभी कभी, नूरी, चांदनी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, मुझसे दोस्ती करोगी आदी अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. याशिवाय त्यांनी यशराजच्या काही सिनेमांमध्ये निर्माती म्हणून देखील काम केले होते.

पामेला चोप्रा यांना शेवटचे यशराज फिल्म्सची डॉक्युमेंटरी असणाऱ्या ‘द रोमॅंटिक्स’मध्ये पाहण्यात आले होते. यात त्यांनी त्यांचे दिवंगत पती असणाऱ्या यश चोप्रा आणि त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले होते. रोमँटिक्स या डॉक्युमेंटरीमध्ये यश चोप्रा यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल दाखवण्यात आले होते. तसेच पामेला यांच्याही योगदानाचा त्यात उल्लेख होता.

पामेला यांनी १९७० मध्ये यश चोप्रा यांच्याशी लग्न केले होते. त्यांचे लग्न हे अरेंज मॅरेज होतं. यश यांचे हे दुसरे लग्न होते. यश आणि पामेला यांना आदित्य आणि उदय चोप्रा ही दोन मुले असून, आदित्य हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. त्याने राणी मुखर्जीशी लग्न केले आहे. तर, उदय एक अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
निधनापूर्वी सतीश कौशिक करत होते ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची तयारी सलमान खानने केला खुलासा

इरफान खान यांचा शेवटचा सिनेमा असलेल्या ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियंस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

हे देखील वाचा