Saturday, September 7, 2024
Home टॉलीवूड बॉलीवूड स्टारपेक्षाही जास्त हवा आहे ‘या’ सहा साऊथ सुपरस्टारची, कमाईतही आहेत बॉलीवुडकरांच्या पुढे

बॉलीवूड स्टारपेक्षाही जास्त हवा आहे ‘या’ सहा साऊथ सुपरस्टारची, कमाईतही आहेत बॉलीवुडकरांच्या पुढे

आपल्या देशात बॉलिवूडसोबत प्रादेशिक चित्रपट सृष्टीदेखील (भोजपुरी, मराठी, टॉलीवूड) मोठ्या स्वरूपात मनोरंजनाच्या इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. सुरुवातीच्या काळात या प्रादेशीक भाषांमधील चित्रपटांना पाहिजे तेवढी ओळख आणि लोकप्रियता नव्हती, मात्र मागच्या काही वर्षांमध्ये याच प्रादेशिक भाषांमधील सिनेमांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट तयार करत संपूर्ण देशसोबतच जगाचेही लक्ष वेधून घेतले. यात अग्रस्थानी आहे दक्षिण भारतीय सिनेसृष्टी. भाषेची अडचण असूनही, या सिनेमांनी संपूर्ण देशात त्यांचे फॅन्स तयार केले आहे. आज अशी स्थिती आहे की, साऊथ इंडस्ट्रीतील कलाकार मानधन, चित्रपटांचे यश, लोकप्रियता, फॅन्स आदी अनेक बाबतीत बॉलिवूडमधील कलाकारांना जोरदार टक्कर देतात. आज या लेखातून आपण असेच काही दाक्षिणात्य कलाकार बघणार आहोत.

यश
केजीएफ फेम यशने या सिनेमामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. केजीएफ सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा देऊन यशने संपूर्ण देशात ओळख मिळवली. आता फॅन्स या केजीएफ सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमा येण्याआधीच तो सुपरहिट होणार असे सांगितले गेले आहे.

अल्लू अर्जुन
सूर्या द सोल्जर, डीजे, आर्या असे एकाहून एक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या अल्लू अर्जुनने त्याचा एक वेगळा फॅन्स क्लब तयार केला आहे. लवकरच अर्जुन त्याच्या ‘पुष्पा’ सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धमाका करायला तयार झाला आहे. अल्लू अर्जुनने अजून बॉलिवूडमध्ये एन्ट्रीकेली नाही तरी त्याचे प्रचंड फॅन फॉलोविंग आहे.

राम चरण
साऊथ सोबत बॉलिवूडमध्ये देखील झळकलेला हा स्टार भलेही बॉलिवूडमध्ये चालला नसला तरी साऊथमध्ये त्याची खूप क्रेझ आहे. त्याची लोकप्रियता एखाद्या बॉलिवूड स्टारला सुद्धा मात देईल एवढी आहे. सध्या रामचरण त्याच्या आगामी आरआरआर सिनेमासाठीही चर्चांमध्ये आहे.

महेश बाबू
अनेक वर्षांपासून महेश बाबू साऊथ सिनेसृष्टीत कामच नाही तर त्या इंडस्ट्रीवर राज्य करत असून, त्याने त्याच्या दमदार आणि प्रभावी अभिनयामुळे त्याचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. महेश बाबुला बॉलिवूडमध्ये काम करण्याची देखील गरज वाटत नाही, इतका तो त्या सिनेसृष्टीत लोकप्रिय आहे.

विजय देवरकोंडा
अर्जुन रेड्डी फेम विजयने संपूर्ण देशात खूप लोकप्रियता मिळवली. त्याची फॅन्समध्ये मोठी क्रेझ आहे. तो लवकरच करण जोहरच्या लाइगर मधून बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात अनन्या पांडे त्याची नायिका म्हणून दिसणार आहे.

प्रभास
‘बाहुबली’ फेम प्रभासचे भारतभरात अनेक फॅन्स आहे. बाहुबलीने प्रभासला भारताबरोबर विदेशातही अनेक चाहते मिळवुन दिले. एका रात्रीत संपूर्ण जगात प्रसिद्ध होणारा प्रभास देखील जबरदस्त लोकप्रिय आहे. त्याने काही हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केले असून, आगामी काळात तो अजून काही हिंदी सिनेमात दिसणार आहे.

हेही वाचा-
बाहुबली फेम एसएस राजामौलींच्या बहुचर्चित सिनेमा  आरआरआर  रिलीजची तारीख ठरली, आलियासह दिसणार  हे कलाकार
हॅप्पी बर्थडे ब्रह्मी! हजारांहून अधिक चित्रपटात अभिनय, कोट्यवधींची संपत्ती; वाचा काॅमेडीच्या महानायकाबाबत
साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यचे आलिशान घर पाहिलंय का? पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा