दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. याच चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य याचा जन्म 23 नोव्हेंबर 1986 मध्ये झाला होता. तेलुगू चित्रपटातील तो एक मोठं नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता म्हणून काम केले आहे. आपल्या वडिलांप्रमाणे तोदेखील लग्झरी लाईफस्टाईल जगतो. आज आपण त्याच्या आलिशान घराबद्दल जाणून घेऊया.
वडील सुपरस्टार असल्यामुळे लहानपणापासूनच नागा चैतन्यही चित्रपटांकडे आकर्षित झाला. त्यानेही आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत या क्षेत्राची निवड केली आहे. नागा चैतन्यचे घर हैदराबादमध्ये आहे. नागा चैतन्यने प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभूसोबत लग्न केले आहे.
या फोटोमध्ये समंथा आपल्या घराच्या मागील बाजूस योगाचा आनंद घेत आहे. ही जागा सायंकाळी थंड हवा आणि सूर्यास्तावेळी नयनरम्य दृश्याचा आनंद घेण्यासाठी शानदार स्थान आहे.
नागा चैतन्यने २००९ मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्याने जोश या चित्रपटातून पदार्पण केले होते. यानंतर नागा चैतन्यने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक शानदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. या फोटोमध्ये नागा, समंथासोबत आपल्या घराच्या टेरेसवर पोझ देताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/B10h8AphBgR/?utm_source=ig_web_copy_link
हा फोटो नागा आणि समंथा यांच्या घरातील आहे. घरामध्ये बनलेल्या स्विमिंग पूलच्या आसपासच्या भागात व्हाईट स्पेस खूपच शानदान वाटते.
https://www.instagram.com/p/Bq4qv6egjjo/?utm_source=ig_web_copy_link
चिल करण्यासाठी समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांचे सर्वात आवडती जागा छत आणि त्यांच्या घरात बनलेले स्विमिंग पूल आहे. दोघे नेहमीच येथे पाहायला मिळतात.
https://www.instagram.com/p/BZ7z60XBCu4/?utm_source=ig_web_copy_link
नागा चैतन्य आणि समंथा रूथ प्रभूने दीर्घ काळापर्यंत एक-दुसऱ्याला डेट केले होते. या दोघांनीही 2015 पासून एकमेकांना दुसऱ्याला डेट करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी लग्न केले.
हेही वाचा-
–जब मै छोटा बच्चा था! ‘या’ मुलाला ओळखलं का? आज आहेत प्रसिद्ध कलाकार
–समंथाच्या अगोदर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नात्यात होता नागा चैतन्य, तर ‘असा’ होता त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास