Tuesday, January 14, 2025
Home नक्की वाचा Bye Bye 2021: अहान शेट्टी ते शर्वरी वाघ, ‘या’ कलाकारांनी २०२१ मध्ये केले बॉलिवूडमध्ये पदार्पण

Bye Bye 2021: अहान शेट्टी ते शर्वरी वाघ, ‘या’ कलाकारांनी २०२१ मध्ये केले बॉलिवूडमध्ये पदार्पण

आता २०२१ हे वर्ष संपल्यातच जमा आहे. घराघरात कोरोनाने माजवलेल्या दहशतीपासून ते चंदेरी दुनियेतील नार्कोटिक्स प्रकारणांपर्यंत हे वर्ष चांगलंच चर्चेत राहिले. कोरोनामुळे सर्व सिनेमागृहे बंद असल्याने, नवीन चित्रपटांना यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मची मदत घ्यावी लागली. सिनेमागृहात चित्रपट पाहता न आल्याने प्रेक्षकांमध्ये देखील नाराजी पाहायला मिळाली. परंतु २०२१ मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रदर्शित झालेल्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नवनवीन कलाकार पदार्पण करताना पाहायला मिळाले.

ज्या कलाकारांनी यावर्षी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली, त्यात काही स्टारकिड्स आहेत, तर काही छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. ज्या कलाकारांनी यावर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. त्यामध्ये अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) याचा मुलगा अहान शेट्टी (Ahan Shetty) ते टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा मकवाना (Mahima Makwana) यांची नावे आहेत. चला तर मग याच कलाकारांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अहान शेट्टी
अहान शेट्टी हा अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आहे. ३ डिसेंबरला अहानचा ‘तडप’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांवर काही खास जादू चालवू शकला नाही. येणाऱ्या वर्षात अहान कोणत्या चित्रपटात दिसणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

महिमा मकवाना
महिमा ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक सीरिअल्समध्ये काम केले आहे. ‘सपने सुहाने लडकपनके’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली. यानंतर तिने अनेक वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम केले. यावर्षी तिने सलमानच्या ‘अंतिम-द फायनल ट्रुथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यापूर्वी तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

मालविका राज
मालविका राज (Malvika Raaj) हिने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. यानंतर तिने अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. यावर्षी मालविका ‘स्क्वॉड’ चित्रपटात लीड रोलमध्ये दिसली आहे.

शर्वरी वाघ
आपल्या बोल्ड लूकमुळे शर्वरी वाघ (Sharvari Wagh) नेहमीच चर्चेत असते. शर्वरीने देखील यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ‘बंटी और बबली २’ या चित्रपटातून शर्वरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यापूर्वी तिने ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेबसिरीजमध्ये काम केले आहे.

प्रणिता सुभाष
प्रणिता सुभाष (Pranita Subhash) हिने देखील यावर्षी बॉलिवूडमध्ये आपले पहिले पाऊल टाकले आहे.

पहिल्याच वर्षी ती २ बॉलिवूड चित्रपटात पाहायला मिळाली. ‘हंगामा २’ या चित्रपटातून शर्वरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘भुज: द प्राईड’ मध्ये देखील लीड रोलमध्ये दिसली.

हेही वाचा :

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा