Wednesday, July 3, 2024

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम ‘ही’ अभिनेत्री लवकरच होणार आई, सोशल मीडियावरून दिली गोड बातमी

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मोहिना कुमारी (Mohena Kumari) सर्वांना आठवतच असेल. या मालिकेत तिने ‘कीर्ती’ ही भूमिका निभावली होती. या भूमिकेने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. आता मोहिनाने तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. हो लवकरच मोहिना आई होणार असून, सोशल मीडियावरून तिने तिचे काही फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे. मोहिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत असून, या फोटोंमध्ये ती तिच्या पती सुयश रावत (Suyesh Rawat) सोबत दिसत आहे.

मोहिनाने तिचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “नव्या सुरुवातीची सुरुवात. तुमच्या सर्वांसोबत गोड बातमी शेअर करत आहे.” तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीच्या कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. या पोस्टनंतर मोहिनाने तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या बेबी बंपवर हात ठेऊन पोझ देताना दिसत आहे. हे फोटो पोस्ट केल्यानंतर तिने सर्वांना आणि देवाला धन्यवाद म्हटले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझे हृदय प्रेम, आनंद आणि आधाराने भरले आहेत. धन्यवाद.”

मोहिनाने २०१९ साली मंत्री आणि आध्यात्मिक गुरु सतपाल महाराज यांच्या लहान मुलासोबत सुयश रावतसोबत लग्न केले. लग्नानंतर मोहिनाने अभिनयाला रामराम ठोकला असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच मोहिना एक कुशल आणि प्रशिक्षित डान्सर देखील आहे.

ही वाचा :

हे ही पाहा :

हे देखील वाचा