Friday, July 5, 2024

अतिशय मनमोकळ्या अंदाजात नाचताना दिसला ‘स्वीटू’चा ‘ओम’! व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

दैनंदिन जीवनातील विरंगुळा घालवण्याचे महत्वाचे माध्यम म्हणजेच टीव्ही. त्यातल्या त्यात टीव्ही मालिका ही प्रेक्षकांची पहिली पसंत असते. उत्तम स्टोरी व योग्य सादरीकरण असेल, तर ती मालिका हिट झालीच म्हणून समजायचं. अशीच एक मालिका सध्या टीव्हीच्या जगात धुमाकूळ घालतेय, ती आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. या मालिकेतील ‘ओम’ अन् ‘स्वीटू’ची लव्हस्टोरी प्रेक्षकांना विशेष भावली. ओम अर्थातच शाल्व किंजवडेकर सोशल मीडिया खूप सक्रिय असतो. दरदिवशी आपले फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करणे, त्याला खूप आवडते. अलीकडेच त्याने शेअर केलेला एक व्हिडिओ चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जातोय.

शाल्वने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाल्व अतिशय मस्त पद्धतीत नाचताना दिसला आहे. यातील शाल्वचा डान्सपाहून कोणाचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचा डान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय.

खरं तर हा व्हिडिओ ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच्या सेटवर शूट करण्यात आला आहे. यातील शाल्वने अगदी मनमोकळ्यापणाने केलेला डान्स चाहत्यांनाही भावला आहे. चाहतेही व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्स करून आपली पसंती दर्शवत आहेत. हा मजेदार व्हिडिओ शेअर करत, शाल्वने कॅप्शनही अतिशय मजेदार दिले आहे. त्याने लिहिले, “जेव्हा तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असता आणि तुमच्या घराबाहेर जोरात म्युझिक चालू असते, तेव्हा तुम्ही गिव्ह अप करता.”

अलीकडेच मालिकेच्या सेटवर शाल्वचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्याचा वाढदिवस अगदी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सेटवर केक कट न करता आल्याने, रात्री बारा वाजता टीमने त्याला दूध आणि हलवा खायला घातला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ ‘येऊ कशी तशी मी नांदायला’च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला होता, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा