Friday, December 20, 2024
[aioseo_breadcrumbs]

रॅप सॉंग्सला भारतात नवीन ओळख मिळवून देणाऱ्या हनी सिंगकडे आहे कोट्यवधींची मालमत्ता

भारतीय संगीत क्षेत्रात सध्या रॅप गाण्याची जोरदार क्रेझ निर्माण झाली आहे. प्रत्येक चित्रपटात एक तरी रॅप गाणे असतेच असते. या गाण्यांना मिळणारी लोकप्रियता पाहूनच प्रत्येक कलाकार आणि दिग्दर्शक खास आपल्या सिनेमासाठी एक हटके रॅप गाणे बनवून घेतात. मात्र या रॅप सॉंग्सची वेड लावण्याचे श्रेय पंजाबी गायक हनी सिंगला जाते. हनी सिंगने आपल्या दमदार आवाजाने आणि खास शैलीने अवघ्या तरुणाईला वेड लावले होते. त्याने तयार केलेले सर्वच रॅप सॉंग्स नेहमीच संगीत क्षेत्रात धुमाकूळ घालत असतात. हनी सिंगच्या गाण्यांपासून ते त्याच्या केसांच्या स्टाइलपर्यंत प्रत्येक गोष्टीचे युवा वर्गाला नेहमीच आकर्षण राहिले आहे. हनी सिंग हा जेवढा त्याच्या गाण्यांसाठी गाजला किंवा गाजतो तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील तुफान गाजला. आज म्हणजे बुधवारी (15 मार्च)ला या प्रसिद्ध पंजाबी गायकाचा वाढदिवस आहे. चला तर मग यानिमित्त जाणून घेऊ त्याच्या रंजक प्रवासाबद्दल…

‘ब्ल्यू आईस’, ‘हाय हिल्स’, ‘पार्टी अभी बाकी है’ यांसारखी जबरदस्त गाणी देणारा गायक हनी सिंगला कोण विसरू शकतं? आज संपूर्ण भारतात त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मुख्यतः तरुण वर्गात त्याची खूप जास्त क्रेझ आहे. ही गोष्ट अनेक चाहत्यांना माहीत नसेल की, हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंग हे आहे. स्टेजवर परफॉर्मन्स करताना त्याने त्याचे नाव हनी सिंग ठेवले आहे. आपल्या गाण्याने आज लाखोंच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या हनी सिंगने त्याच्या करिअरची सुरुवात यूट्यूब व्हिडिओने केली होती. त्यानंतर रातोरात तो इंटरनेट सेंसेशन बनला होता. (Singer honey Singh is owner of crore’s property)

हनी सिंगने सुरुवातीच्या काळात खूप मेहनत केली आहे. पण आज हनी सिंग कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्या रॅप स्टाईलने त्याने प्रत्येकाच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. आज आपण त्याच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया जी त्याने त्याच्या मेहनतीने कमावली आहे.

माध्यमातील वृतानुसार, हनी सिंग हा एका गाण्यासाठी 15 लाख एवढी फी घेतो. त्यामुळे तो सर्वाधिक फी घेणाऱ्या पंजाबी गायकांपैकी एक आहे. हनी सिंगची संपत्ती आता 20 टक्क्यांपेक्षा वाढली आहे. तसेच तो भारतातील सर्वात जास्त टॅक्स देणाऱ्या व्यक्तींपैकी आहे.

हनी सिंगकडे अनेक घरं आहेत. त्याचे पंजाबमध्ये 3 कोटींपेक्षा अधिक रुपयांचे घर आहे. तसेच गुडगाव, दिल्ली आणि मुंबईमध्ये त्याची आलिशान घरे आहेत. हनी सिंगला गाड्यांची देखील खूप आवड आहे. त्याच्याकडे अनेक प्रकारच्या गाड्या आहेत.‌ ऑडी क्यू 7, ऑडी आर 8, जग्वार, रोल्स, बीएमडब्ल्यू यांसारख्या गाड्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आरआरआर’ने ऑस्कर जिंकल्याचा आनंदात भारतीच्या मुलाने केला जल्लाेश, व्हिडिओ व्हायरल

‘नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं….,’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा सून शिवानी रांगोळे हिला मजेशीर सल्ला

हे देखील वाचा