यूट्यूब व्हिडिओने केली करिअरची सुरुवात; आज हनी सिंग आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक; आलिशान गाड्यांची लागलीय लाईन


‘ब्ल्यू आईस’, ‘हाय हिल्स’, ‘पार्टी अभी बाकी है’ यांसारखी जबरदस्त गाणी देणारा गायक हनी सिंगला कोण विसरू शकतं? आज संपूर्ण भारतात त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मुख्यतः तरुण वर्गात त्याची खूप जास्त क्रेझ आहे. ही गोष्ट अनेक चाहत्यांना माहीत नसेल की, हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंग हे आहे. स्टेजवर परफॉर्मन्स करताना त्याने त्याचे नाव हनी सिंग ठेवले आहे. आपल्या गाण्याने आज लाखोंच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या हनी सिंगने त्याच्या करिअरची सुरुवात यूट्यूब व्हिडिओने केली होती. त्यानंतर रातोरात तो इंटरनेट सेंसेशन बनला होता. (Singer honey Singh is owner of crore’s property)

हनी सिंगने सुरुवातीच्या काळात खूप मेहनत केली आहे. पण आज हनी सिंग कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्या रॅप स्टाईलने त्याने प्रत्येकाच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. आज आपण त्याच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया जी त्याने त्याच्या मेहनतीने कमावली आहे.

रॅपर यो यो हनी सिंग हा पंजाबीमधील सर्वात श्रीमंत गायकांपैकी आहे. तो जवळपास 173 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. माध्यमातील वृत्तानुसार, हनी सिंग दरवर्षी 42 कोटी रुपयांची कमाई करतो. 100 पेक्षाही जास्त हिट गाणी दिलेल्या हनी सिंगकडे 25 मिलियन यूएस संपत्ती आहे. जे भारतीय चलनाप्रमाणे 173 कोटींच्या आसपास आहे.

माध्यमातील वृतानुसार, हनी सिंग हा एका गाण्यासाठी 15 लाख एवढी फी घेतो. त्यामुळे तो सर्वाधिक फी घेणाऱ्या पंजाबी गायकांपैकी एक आहे. हनी सिंगची संपत्ती आता 20 टक्क्यांपेक्षा वाढली आहे. तसेच तो भारतातील सर्वात जास्त टॅक्स देणाऱ्या व्यक्तींपैकी आहे.

हनी सिंगकडे अनेक घरं आहेत. त्याचे पंजाबमध्ये 3 कोटींपेक्षा अधिक रुपयांचे घर आहे. तसेच गुडगाव, दिल्ली आणि मुंबईमध्ये त्याची आलिशान घरे आहेत.

हनी सिंगला गाड्यांची देखील खूप आवड आहे. त्याच्याकडे अनेक प्रकारच्या गाड्या आहेत.‌ ऑडी क्यू 7, ऑडी आर 8, जग्वार, रोल्स, बीएमडब्ल्यू यांसारख्या गाड्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वडिलांच्या प्रेम आणि त्यागावर आधारित हिंदी चित्रपट, ज्यांनी दिली अनोखी ओळख; ‘फादर्स डे’निमित्त घ्या जाणून

-जेव्हा राजेश खन्नांनी अमिताभ यांना विचारले, ‘सुपरस्टार झाल्यावर कसे वाटते?’; ‘या’ शब्दांत दिली होती ‘बिग बीं’नी प्रतिक्रिया


Leave A Reply

Your email address will not be published.