टेलिव्हिजनवर अनेक नवीन मालिका आल्या आहेत. नवीन आलेल्या प्रत्येक मालिकेची कहाणी काही वेगळी आणि प्रेक्षकांना भावणारी आहे. यासोबत अनेक नवीन अभिनेत्रींनी देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे तर काहींनी नव्याने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. अशातच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने देखील टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे. कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगिता मुख्य भूमिकेत काम करत आहे.
अंतरा नावाच्या एका साध्या, जिद्दी, मेहनती आणि प्रामाणिक मुलीचे पात्र ती अगदी हुबेहूब निभावत आहे. तिच्या या पात्राने सगळ्यांना भुरळ. घातली आहे. योगिता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. (Yogita chavhan share her beautiful photo on social media)
योगिताने (yogita chavhan) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने लाल रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. फोटोमधील तिची पोझ तिच्या चाहत्या वर्गाला भुरळ घालणारी आहे. तिचा हा फोटो सगळ्यांना खूप आवडला आहे.
हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “मी माझे लाल रंगाचे कपडे कोणत्याही डेटसाठी ठेवत नाही, मी ते माझ्यासाठी मला आवडेल तेव्हा घालते.” तिचा हा लूक सगळ्यांना खूप आवडला आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगितासोबत अभिनेता सौरभ चौगुले हा मुख्य भूमिकेत आहेत. त्यांचे अंतरा आणि मल्हार हे पात्र सगळ्यांना खूप आवडत आहे. त्यांच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत असते. त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील सगळ्यांना खूप आवडते.
हेही वाचा :
नवीन वर्षाच्या रात्री नेहा कक्कर अन् रोहनप्रीतमध्ये घडले ‘असे’ काही, की स्टेजवरच गायिकेला कोसळले रडू
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विशाल-विकास जोडीने घेतले जोतिबाचे दर्शन, पाहा व्हिडिओ