जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर अनेक इंस्टाग्राम रील्समध्ये तुम्ही ‘मानिके मागे हिते’ हे गाणं हमखास ऐकलं असेल. श्रीलंकेतील गायिका योहानी दिलोकने हे गाणे आपल्या सुमधुर आवाजामध्ये गायलेले आहे. श्रीलंकेच्या या गाण्याने भारतामध्ये देखील तुफान पसंती मिळवली. भारतामध्ये आता अनेक चाहत्यांच्या फोनची कॉलर ट्यून देखील या गाण्याचीच आहे.
श्रीलंकी भाषेतील या गाण्याचे इंग्रजी, हिंदी, तामिळ अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या सर्वांमध्ये कुठेच मागे नसलेली भोजपुरी इंडस्ट्री देखील कशी काय मागे राहील. भोजपुरी भाषेमध्ये देखील योहानीचं हे गाणं आता ऐकता येणार आहे. या गाण्याचे भोजपुरी वर्जन १९ सप्टेंबर रोजी भोजपुरी भाषेत एका यूट्यूब चैनल वरून प्रदर्शित करण्यात आले. रॅपर बिहारी जिप्सी सोलने हे गाणं कंपोज केलं आहे, तर ऋषी आणि अभिषेकला हे गाणं लिहिण्यासाठी जिप्सी सोलने देखील मदत केली. (Yohani song manike mage hithe Bhojpuri version released, songs video goes viral on social media)
या गाण्याने बॉलिवुडचे बिग बी देखील भारावले होते. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या गाण्याच्या एका व्हिडिओवर योहानीचे हे गाणे लावून पोस्ट केले होते. अमिताभ बच्चन यांना देखील या श्रीलंकन गायिकेचे हे गाणे खूप आवडले.
हे गाणं जेव्हा सुरुवातीला सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं, तेव्हा अनेकांना हे महाराष्ट्रातील एका मुलीने गायलेलं गाणं आहे असं वाटत होतं. काही काळानंतर योहानी ही महाराष्ट्रीयन नाहीतर श्रीलंकन आहे हे समजले.
योहानीच्या या गाण्याने सोशल मीडियावर मोठा कल्ला केला आहे. हिंदीमध्ये रॅपर सतीश आणि योहानीच्या या गाण्याला आता पर्यंत कोटींच्या घरामध्ये लाइक्स मिळाले आहेत. भोजपुरी भाषेत प्रदर्शित झालेलं हे गाणं देखील चाहत्यांच्या मनावर सध्या राज्य करत आहे. या गायिकेने आजवर अनेक गाणी गायली आहेत परंतु तिचे हेच गाणे सातासमुद्रापार देखील हिट झाले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Bigger Boss 15: शोमध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब
-अनोख्या फॅशन सेन्समुळे पुन्हा चर्चेत आली उर्फी जावेद, व्हायरल फोटोवर ट्रोलर्सचा निशाणा
-जेव्हा अक्षय कुमारवर झाला होता जीवघेणा हल्ला; आवाज जरी केला, तर झाडल्या गेल्या असत्या गोळ्या