Saturday, March 15, 2025
Home बॉलीवूड आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशा काही घटना घडत असतात, ज्याची आपण कधी अपेक्षा देखील करू शकत नाही. त्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. अशीच एक घटना अभिनेता आर. माधवनसोबत घडली आहे. ती घटना पाहून माधवन आश्चर्याचा धक्काच बसला. त्याचबरोबर त्याने या सर्व घटनेचा फोनमध्ये एक व्हिडिओ बनवला आहे. त्याने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर देखील केला आहे.

खरं तर त्याचे झाले असे की, माधवन हा विमानतळावर गेला होता, तेव्हा संपूर्ण विमानतळ रिकामे दिसून आले. इतकेच नव्हे तर पूर्णपणे विमान देखील रिकामे होते. होय हे खरं आहे, माधवन दुबईला निघालेल्या विमानात एकही व्यक्ती नव्हता. माधवनने याचा एक व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओमध्ये दाखवले की, त्यांचे विमान पूर्णपणे रिकामे आहे आणि या संपूर्ण विमानामध्ये तो एकमेव प्रवासी आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करत माधवनने म्हटले आहे की, “माझ्यासाठी हा माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचा विमान प्रवासातील एक अतिशय अनोखा क्षण आहे. मी हे का सांगत आहे, तेही मी तुम्हाला दाखवतो.” (You will be surprised to see this video posted by Madhavan)

याचबरोबर आर माधवनने आणखी दोन व्हिडिओदेखील शेअर केले आहेत. ज्यात विमानतळ ही रिकामे असल्याचे दिसून येत आहे. माधवनच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. त्याचबरोबर असेही म्हणत आहेत की, हे संपूर्ण दृश्य एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे आहे.

माधवन मागील काही दिवसांपासून नेटफ्लिक्सच्या ‘दीपपालड’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या मालिकेत माधवन लेखक आर्य अय्यरच्या भूमिकेत आपल्या सर्वांना दिसणार आहे. माधवनने या मालिकेच्या पहिल्या हंगामाचे शूटिंग जुलैच्या महिन्याच्या शेवटच्या दिवसात पूर्ण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा