Sunday, June 8, 2025
Home कॅलेंडर अबब एवढी किंमत! उर्वशी रौतेलाच्या ‘या’ ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही अवाक व्हाल

अबब एवढी किंमत! उर्वशी रौतेलाच्या ‘या’ ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही अवाक व्हाल

उर्वशी रौतेला बॉलीवूड आणि मॉडेलिंग इंडस्ट्रीमधले मोठे नाव. ‘सिंग साहेब दी ग्रेट’ सिनेमातून पदार्पण केलेल्या उर्वशीने तिच्या सौंदर्याच्या आणि प्रतिभेच्या जोरावर बॉलीवूडमध्ये तिचे वेगळे स्थान निर्माण केले. उर्वशी नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्ड लूक्स मुळे चर्चेत असते.

उर्वशीला नेहमीच वेगवेगळ्या मासिकांच्या कव्हर पेजवर झळकत असते. तिचा सुंदर आणि फोटोजेनिक चेहरा नेहमीच सर्वाना आकर्षित करतो. आता सध्या उर्वशीच्या चर्चेत असण्याचे कारण म्हणजे उर्वशीने नुकतेच एका अरब मासिकासाठी फोटोशूट केले असून, या शूटचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत.

उर्वशीने ‘सोल’ या अरब मासिकासाठी नुकतेच एक बोल्ड आणि ब्युटिफूल असे फोटोशूट केले आहे. त्याच फोटोशूट मधील काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहे. या फोटोंसोबतच तिने एक सुंदर मेसेज देखील लिहला आहे. उर्वशी लिहिते, ” स्वप्न तेव्हाच खरी होतात जेव्हा ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो. कारण आपल्या यासोबतच स्वप्नांना खूप मागणी आहे.” यासोबतच तिने सांगितले आहे की, ती ”सोल’ मासिकाच्या कव्हर पेजवर झळकणारी उर्वशी पहिली आशियायी आणि भारतीय मॉडेल आहे.’

 

या फोटोशूट दरम्यान उर्वशीने एक लाल आणि एक केशरी असे दोन प्रकारचे गाऊन घातले आहे. या दोन्ही ड्रेसमध्ये उर्वशी अतिशय ग्लॅमरस दिसत होती. उर्वशीने घातलेल्या या दोन्ही ड्रेसची किंमत सुमारे पन्नास लाख इतकी होती. एक ड्रेस पंचवीस लाखांचा होता. हे ड्रेस घालून उर्वशीने अरब देशातील वाळवंटात उभे राहून फोटोशूट केले. याच फोटोशूटमधले काही फोटो आणि व्हिडिओ तिने तिच्या अकाऊंटवर पोस्ट केले आहे. हे फोटो झपाट्याने वायरल होत असून उर्वशीला तिच्या फॅन्सकडून अतिशय चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे.

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर उर्वशीचे ‘एक डायमंड दा हार लेदे यार’ हे गाणे आणि नुकताच मोहसीन खान सोबत एक गाण्याचा अल्बम प्रदर्शित झाला आहे. ती लवकरच ‘ब्लॅक रोज’ नावाच्या तेलगू सिनेमातही दिसणार आहे.

हे देखील वाचा