प्रसिद्ध हरियाणवी गायिका अंजली राघव हिचे नवीन गाणे सध्या यूट्यूबवर ट्रेंड होत आहे. हरियाणवी म्युझिक इंडस्ट्रीच्या या प्रसिद्ध, सुंदर अभिनेत्री आणि गायिकेचे नवीन गाणे रिलीज होताच प्रेक्षाकांनी उदंड प्रतिसाद दिला असून, ते यूट्यूबवर चांगलेच गाजताना दिसत आहे. या गाण्याला आतापर्यंत २५लाखाहून अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत.
अंजली राघव हिचे हे नवीन गाणे दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहे. हे गाणे रिलीज होताच, सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. हरियाणाची अंजली एकामागून एक नवीन गाण्यांनी खूप प्रसिद्ध होत आहे. या नवीन म्युझिक व्हिडिओमध्ये कुलदीप राठी, अंजली राघव सोबत आहेत.या दोघांची जोडी ही खूप छान दिसत आहेत.
‘बहु नाची किलकी पति’ असं अंजली राघवच्या नवीन गाण्याचे नाव आहे. या गाण्यात अंजली राघव आकाशी निळ्या रंगाच्या घागर्यामध्ये मस्त डान्स करताना दिसत आहे. अंजलीची सुंदर शैलीदेखील हे गाण्यातून प्रसिध्द होत आहे. दोन दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्याला २५लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्यात अंजलीने देसी लुक परिधान केला आहे. तिच्या सर्व गाण्यांप्रमाणेच यातही अंजली खूपच सुंदर दिसत आहे.
सुप्रसिद्ध हरियाणवीची नृत्यांगना आणि गायिका अंजली राघव, यांच्या हरयाणवी गाण्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. एखादे नवीन गाणे रिलीज होताच, ते थोड्याच वेळात व्हायरल होण्यास सुरवात होते. या गाण्याला चाहत्यांकडूनही पसंती मिळत आहे.
अंजलीच्या या गाण्याबरोबरच कुलदीप राठीसुद्धा शानदार अभिनय करताना दिसला आहे. ”बहु नाची किलकी पति’ या गाण्याचे बोल राजू यांनी लिहिले आहेत. गाण्यामध्ये अंजली राघवचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे, जे चाहत्यांना वेड लावत आहे.
सपना चौधरी यांच्यामुळे हरियाणवी गाण्यांची क्रेझ फक्त हरियाणाच नाही, तर उत्तर प्रदेश,बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशातही आहे. हेच कारण आहे, की सपनाबरोबरच हरियाणा संगीत उद्योगातील अनेक कलाकार खूप प्रसिद्ध होत आहेत.