हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या स्टाईल आणि डान्सचे लाखो चाहते आहेत. चाहते तिच्या प्रत्येक गाण्यांवर जोरदार डान्स करतात. सपनाच्या प्रत्येक अदांवर देखील तिचे चाहते नेहमीच फिदा होतात. अनेक अडचणींना सामोरे गेल्यानंतर तिने हे स्थान मिळवले आहे. आज ती तिच्या चाहत्यांमध्ये ‘हरियाणवी डान्स क्वीन’ म्हणून प्रसिद्ध आहे. जर तिचे कोणतेही नवीन गाणे आले, तर चाहते गाणे ऐकण्यासाठी आणि तिच्या डान्सच्या मूव्ह्ज पाहण्यासाठी उत्सुक होतात. सपना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
नुकतेच सपनाचे आणखी एक नवीन गाणे ‘काला चुंदड’ (Kala Chundad) प्रदर्शित झाले आहे. प्रदर्शित होताच या गाण्याचा व्हिडिओ युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याचे बोलही चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून, सपनाच्या चाहत्यांसाठी हे गाणे एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नाही.
सपनाच्या (Sapna Choudhary) या गाण्याला यूके हरियाणवीने आवाज दिला आहे, तर मनीष तोमर सपनासोबत गाण्यात परफॉर्म करताना दिसत आहे. गाण्याचे बोल प्रेम जांगरा यांनी दिले आहेत, तर संगीत डीएनसी स्टुडिओने दिले आहे. हे गाणे ड्रीम्स एन्टरटेन्मेंट या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहे. या गाण्याच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सवर सातत्याने कमेंट करून चाहते सपनाच्या या गाण्याचे कौतुक करत आहेत.
या गाण्यात सपना आणि मनीष तोमरची जोडी खूप पसंत केली जात आहे. याआधी सपनाचे हरियाणवी गाणे ‘पिलीये मे पिस्तूल’ प्रदर्शित झाले होते. या गाण्याचे व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या गाण्यातही सपनाची जबरदस्त स्टाईल दिसत आहे. या गाण्यात ती वकिलाच्या भूमिकेत होती, तर बीरू कटारिया दबंगच्या भूमिकेत होता.
सपना चौधरीने हरियाणाच्या ऑर्केस्ट्रा पार्टीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती हरियाणाच्या जवळपासच्या राज्यांमध्ये रागिनीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागली. हळूहळू तिची लोकप्रियता वाढू लागली. त्यानंतर ती संपूर्ण भारतात ओळखली जाऊ लागली. सपना चौधरी देखील ‘बिग बॉस ११’ चा भाग राहिली आहे. सपनाने ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट काही विशेष कामगिरी करू शकला नाही, पण सपना म्युझिक व्हिडिओ आणि स्टेजवर सतत धमाल करताना दिसते.
हेही वाचा-