‘चंद्रावल’ गाण्यात सपना चौधरीचा देसी अंदाज प्रेक्षकांना भावला, दोन दिवसांत गाण्याला लाखो व्हिव्ज


हरयाणवी लोकगायिका आणि डान्सर सपना चौधरी उत्तर भारतासोबतच संपूर्ण देशात प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक वर्षे डान्स शोच्या माध्यमातून तिने सर्वांनाच भुरळ घातली आहे. तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी असते. शिवाय सपनाने बिग बॉस या रियालिटी शोच्या ११ व्या पर्वात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. सपनाचे जवळपास सर्व गाणे चाहत्यांना खूप आवडतात. तिच्या जुन्या नव्या सर्व गाण्यांच्या व्हिडिओला खूप लाईक्स मिळत असतात. नुकतेच सपनाचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे आणि विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे हे गाणेही सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे.

सपनाचे २०२१ या नवीन वर्षातले पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. गाण्याचे नाव आहे, ‘चंद्रावल’. या गाण्याने प्रदर्शित होताच जोरदार धमाका केला आहे. १७ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आतापर्यंत २१ लाखांपेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. या गाण्यातला सपनाचा अंदाज आणि डान्स लोकांना अक्षरशः वेड लावत आहे.

सपनाच्या या गाण्याचे व्हिव्ज सतत वाढताना दिसत आहेत.  सपनाचे हे गाणे तिच्या ‘सोनोटेक’ नावाच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहे. या गाण्याबाबत लोकांची सतत वाढणारी क्रेझ सपनाला सुखावणारी आहे.

दरम्यान सपनाचे चंद्रावल हे गाणे प्रवीण तोशम यांनी गायले असून, या गाण्यात सपना चौधरी आणि सुमित कौशिक दिसत आहे. या गाण्यात सपनाचा अवतार हा पूर्णपणे देसी असून नेहमीप्रमाणे ती या गाण्यात आणि या अवतारात सुंदरच दिसत आहे. सपनाने हे गाणे तिच्या सर्व फॅन्ससाठी नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणून दिले आहे.

सपनाचे अजून एक गाणे २० जानेवारीला प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे नाव आहे ‘लोरी’. या गाण्यात सपना एका आईची भूमिका निभावत आहे. हे गाणे देखील तिच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज होणार आहे.

दरम्यान मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सपना चौधरीचे तीन गाणे प्रदर्शित झाले होते. नलका, चटक मटक आणि कतल या गाण्यांनाही इतर गाण्यांप्रमाणे लोकांनी पसंतीची पोचपावती दिली आहे. चटक मटक हे गाणे तर अजूनही यूट्यूबवर टॉपला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.