Monday, July 1, 2024

कॅरी मिनाटी करणार ‘या’ चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण!

बॉलिवूड मध्ये येण्याचं लाखो तरुणांचं स्वप्नं असतं परंतु फार कमी जणं असतात जे स्वतःला सिद्ध करतात. अनेक जण असेही आहेत ज्यांना बॉलिवूड मध्ये संधी नाही मिळाली परंतु त्यांनी स्वतःच युट्युब चॅनल सुरू केलं आणि त्यावरून भन्नाट कंटेंट बनवून त्याच्या व्हिडीओज युट्युब वर अपलोड करू लागले. ते स्वतःच्या टॅलेंटवर आणि स्वतःच्या हिंमतीवर इतके प्रसिद्ध झाले की आज त्यांचा स्टेटस कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटिपेक्षा कमी नाहीये. आणि अशाच काही युट्युबर्स ना आता बॉलिवूड मध्ये सुद्धा संधी मिळू लागली आहे.

ज्यामध्ये आपण मोस्टली सेन म्हणून प्रसिद्ध असलेली मराठमोळी युट्युबर प्राजक्ता कोळी काही दिवसांपूर्वी आपल्याला नेटफ्लिक्स च्या मिसमॅच या वेबसिरीज मध्ये दिसली होती सोबतच आता ती चंदिगढ मध्ये नितु कपूर, अनिल कपूर यांच्या समवेत जुग जुग जियो या तिच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. असाच बीबी की वाईन्स मधला भुवन बाम आपल्याला भारतीय सैनिकावर आधारित एक लघुपटात दिसला होता. सुप्रसिद्ध युट्युबर आशिष चंचलानीचा एक व्हिडिओ तर थेट एमआयबी या हॉलिवूडपटात झळकला होता. आणि याच यादीत आता आणखीन एक युट्युबर ची भर पडणार आहे ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका कॅरीमिनाटी उर्फ अजय नागर!

अजय देवगण सध्या हैदराबादमध्ये स्वतः दिग्दर्शित करत असलेल्या ‘मेडे’ या चित्रपटाचं चित्रीकरण करीत आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन, रकुल प्रीत सिंह आणि अंगिरा धर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका असणार आहेत. आता, सिनेमाच्या टीममध्ये नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे तो म्हणजे लोकप्रिय भारतीय यूट्यूबर कॅरीमिनाटी!

माध्यमांनुसार , चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी कॅरी तयार झाला आहे. तो म्हणाला की निर्माते मंगत पाठक यांच्यासोबत काम करण्याची त्याची फार पूर्वीपासूनची इच्छा होती. त्याचा भाऊ / व्यवसाय प्रमुख दीपक चार याला पाठक यांच्या टीमचा फोन आला. स्वतःचच पात्र कॅरीमिनाटी हे चित्रपटात साकारायचं असल्याने ते कसं उभं राहतं हे पाहण्यासाठी तो इच्छुक आहे.

शिवाय कॅरी म्हणाला की , पूर्णवेळ अभिनयात करियर करायचं नसलं तरी अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकण्याची त्याची इच्छा आहे कारण या दोन व्यक्ती फक्त व्यक्तिमत्त्व नसून स्वतःत एक संस्थानं आहेत. त्यांच्या कडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे.

या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्म्स करत असून दिग्दर्शन अजय देवगण स्वतः करत आहेत. हा सिनेमा २९ एप्रिल २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा