छत्तीसगडमधील प्रसिद्ध कॉमेडियन देवराज पटेल याचे रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. देवराज रायपूरमध्ये एक कॉमेडी व्हिडिओ शूट करणार होता. दरम्यान, ट्रकच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली. देवराज पटेलचा ‘दिल से बुरा लगता है’ हा डायलॉग देशभरात व्हायरल झाला होता. मात्र, रायपूर येथे सोमवारी (26 जुन)ला झालेल्या अपघातात देवराज याचा मृत्यू झाला, ज्यामुळे छत्तीसगडमध्ये शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही ट्विट करून देवराज पटेल याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
देवराज पटेल (devraj patel) याच्या निधनावर सीएम भूपेश बघेल यांनी ट्विट केले की, ‘दिल से बुरा लगता है’ ने करोडो लोकांमध्ये आपले स्थान निर्माण करणारे देवराज पटेल, ज्याने आम्हा सर्वांना हसवले, ते आज आम्हाला सोडून गेले. या तरुण वयात अप्रतिम प्रतिभा. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती:”
“दिल से बुरा लगता है” से करोड़ों लोगों के बीच अपनी जगह बनाने वाले, हम सबको हंसाने वाले देवराज पटेल आज हमारे बीच से चले गए.
इस बाल उम्र में अद्भुत प्रतिभा की क्षति बहुत दुखदायी है.
ईश्वर उनके परिवार और चाहने वालों को यह दुःख सहने की शक्ति दे. ओम् शांति: pic.twitter.com/6kRMQ94o4v
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) June 26, 2023
खरे तर, देवराज पटेल हा मूळचा महासमुंद जिल्ह्यातील डाब पाली गावचा रहिवासी होता. संपूर्ण कुटुंबही गावातच राहते. वडील घनश्याम पटेल शेती करतात. मात्र, व्हिडिओ संदर्भात ताे रायपूर जिल्ह्यात राहत असे. दरम्यान, सोमवारीही रायपूर शहरातील लभंडी भागात व्हिडिओ बनवण्यासाठी देवराज गेला हाेता. मात्र, भरधाव ट्रकने त्याला धडक मारली आणि अपघातात देवराज याचा जागीच मृत्यू झाला.
देवराज पटेल यांचे यूट्यूबवर 4 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्याच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळायचे. तो वेगवेगळ्या विषयांवर मजेदार व्हिडिओ बनवत असे. त्याने 2021 मध्ये दिल्लीच्या प्रसिद्ध कॉमेडियनने भुवन बामसोबत धिंडोरामध्ये काम केले होते. यासोबतच देवराज छत्तीसगड सरकारच्या डॉक्युमेंट्री फिल्म्समध्ये सतत काम करत होता. इतकेच नव्हे, तर देवराज यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्री भूपेश बघेलसोबत एक व्हिडिओही बनवला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याशिवाय देवराज पटेल यांनी आजच इन्स्टाग्रामवर शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता.(YouTuber devraj patel died in road accident )
अधिक वाचा-
–अर्जून कपूरचा वाढदिवस, कथित बॉयफ्रेंडच्या बर्थडे पार्टीत 49 वर्षीय मलायकाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल
–रामानंद सागर यांच्या पणतीवर लैगिंक अत्याचार? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा