Thursday, April 10, 2025
Home बॉलीवूड चित्रपट ही महाराष्ट्राची देन आहे भारताला; अभिनेता राघव जुयालचे पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य…

चित्रपट ही महाराष्ट्राची देन आहे भारताला; अभिनेता राघव जुयालचे पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य…

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी  निर्मित युध्रा हा नवीन ॲक्शन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, साउथ अभिनेत्री मालविका मोहनन आणि अभिनेता राघव जुयाल हे मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा ठीकठाक प्रतिसाद या ट्रेलरला मिळाला आहे. मात्र चित्रपटाची टीम निरंतर प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. नुकतीच या टीमने पुण्यात हजेरी लावली होती. 

या भेटीत चित्रपटातील तिन्ही मुख्य कलाकार यावेळी उपस्थित होते. पत्रकारांशी टीमने यावेळी संवाद साधला. अनेक प्रश्नांची कलाकारांनी दिलखुलास पणे उत्तरे दिली. यादरम्यान अभिनेता राघव जुयाल याला एक प्रश्न विचारण्यात आला होता व त्याने त्यावर उत्तर दिले.  त्याने दिलेले उत्तर ऐकून प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीला अभिमान वाटेल. 

पत्रकारांच्या प्रश्नावर यावेळी राघवने उत्तर दिले. प्रश्न होता कि राघवला मराठी किंवा इतर प्रादेशिक चित्रपटांच्या ऑफर्स येतात का ?   येत असतील तर राघवला त्यांत काम करायल आवडेल का? आणि या सिनेमांविषयी त्याचे मत काय ?यावर राघवने दिलेले उत्तर अगदी सुंदर होते आणि तिथे बसलेल्या प्रत्येक मराठी व्यक्तीचे राघवने उत्तरातून मन जिंकले. राघव म्हणाला कि त्याला अनेक रिजनल चित्रपटांच्या ऑफर्स येतात व त्याला यांत काम करायला देखील नक्कीच आवडेल.

राघव पुढे म्हणाला की, प्रादेशिक सिनेमे हे मेनस्ट्रीम सिनेमांपेक्षा उत्कृष्ट आहेत. मराठीत किल्ला, कोर्ट, नागराज मंजुळे यांचे सिनेमे असे एकाहून एक सरस चित्रपट बनले आहेत. अशा प्रकारचे सिनेमे बनवायला हिंदी वाल्यांना वर्षे लागतील. मराठीतल्या अशा उत्तम सिनेमांतूनच आम्ही अभिनय शिकलो आहे. मराठी रंगभूमी सुद्धा खूप श्रेष्ठ आहे. महाराष्ट्रात्त चित्रनगरी असायला एक कारण आहे. मुळात चित्रपट ही महाराष्ट्राचीच देन आहे भारताला.  

यावेळी त्याने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांचे विशेष कौतुक केले. त्याच प्रमाणे मराठी आणि मल्ल्याळम चित्रपट हे आज सर्वात पुढे असल्याचं तो म्हणाला. असे चित्रपट समजायलाच हिंदी वाल्यांना अनेक वर्षे जातील बनवणे तर राहूच द्या असेही तो म्हणाला. महाराष्ट्रात जो सिनेमाचा फील आहे तो इतरत्र कुठेई नाही असेही तो म्हणाला. 

दरम्यान राघव यावर्षी आलेल्या सुपरहिट किल या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत झळकला होता. यातील त्याच्या कामाचे कौतुक झाले होते. युध्रा या चित्रपटातही तो खलनायकाच्या भूमिकेत आहे.  

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

इब्राहिमचा मेसेज वाचून आलिया म्हणाली होती हा मुलगा खूप क्यूट आहे…

हे देखील वाचा